तारुण्याचा उंबरठा....

जिवन जगत असतांना प्रत्येकास तारुण्याचा उंबरठा ओलांडावाच लागतो. खरतर हेच वय ऐन उमेदिचं असतं.या काळात मानवी जिवन सुसंस्कारी, समृद्ध जगण्याची कला अवगत व्हायला हवी. हे वयच असत घडण्याचं व बिघडण्याचं... आम्हाला कसं घडायच ? भावी जिवनाची ध्येय्यधोरण समर्थपणे कशी आखायची व राबवायची ? हे याच तारुण्यात ठरवाव लागतं. एखाद पाउल वेडवाकड पडल तर... आयुश्याची वाट चुकत जाते. तारुण्य हे असच असत... कुणाला छळत ... कुणाला जाळत... कुणाला भाळत... कुणाला मोहित करत... तर कुणाला प्रेरित करत ....
तारुण्य असत तरी काय ? आयुश्याच्या वाटेवरती येणार आडवळण म्हणजे तारुण्य... यशाच्या रेषेजवळ पोहचताच अडखळणारे पाय म्हणजे तारुण्य ... जगणं आणी मरणं यातिल मधल अंतर म्हणजे तारुण्य... खरच तारुण्यात असताना प्रत्येकानी भरभरुन जगाव. कि आपल आयुश्य दुस-यानी उसणं मागावं. जगण्याचे रंग आयुश्यात उतरविता आले पाहिजे. नुसत जगणं म्हणजे जगणं नव्हे तर स्वताचे क्षण दुस-याला समर्पित करणं म्हणजे खर जगणं... हे तारुण्यचं असं असतं...
           
 कधी या वेलीवरुन त्या वेलीवर मुक्त उडत असतं. स्वप्नांचं नवं भावविश्व निर्माण करतं. शरीरात सळसळणारी उर्जा व मेंदूमध्ये सुचणा-या अकल्पित विचार धारा याचा सुंदर मिलाप घालुन आयुश्य सजविता आल पाहिजे. तारुण्याचं फुलण... बहरण... हरवण... कोमेजण... प्रत्येकाचं स्वतावर अवलंबुन असतं.
            
तरुण असो वा तरुणी प्रत्येक जण आपल्या आपल्या आयुश्याचा रंग वेगळ्या पद्धतीने मांडण्यासं सज्ज असतो. तारुण्याचा उंबरठा गाठतानां कुठला मार्ग निवडावा हेच कळत नाही. प्रत्येकाची द्विधा मनस्थिती निर्माण होते. त्यातुन सुखकर मार्ग शोधणाराचं खरा वाटसरु... तारुण्याचा उंबरठा  हा अपघाताच लक्षण जास्त सांगतो. कुठ ? केव्हा ? कशा पद्धातीने अपघात होईल. याची कुठलीच शाश्वती नसते.
            
तरुण आणी तारुण्य यातिल नेमका फरक आम्हाला कळला पाहिजे. झोपाळ्यावरती झोपा घेण्यापेक्षा वादळ वा-यावर स्वार होतो तोच खरा तरुण... व या वादळ वा-यातुन स्वत:ची एक वेगळी वाट निर्माण करणारं आयाम म्हणजे तारुण्य ... तारुण्य तसं अंधारही नसतो आणी प्रकाशही नाही.
          

तारुण्यातुनचं मानवी जिवनाला एक वेगळी कलाटणी मिळते. तारुण्य... सांगायलाही बरं वाटतं. ऐकायलाही बरं वाटतं पण सत्यामध्ये उतरविनांना खुप ओढताण करावी लागते तारुण्य प्रत्यक्षात उतरविणं खुप कठिण असतं. जणु ते एक कोडाचं! हे कोड जो यशस्वीपणे सोडवितो यश त्याच्या पायदळी लोटांगण घालतं. तारुण्यासाठी मोठ मापदंड मोजाव लागतं. कारण अंतरंगातिल मन बावचाळलेलं असतं. मनाच्या तठस्थतेला कुठलाच उपाय नाही. त्यामुळे तारुण्याचा उंबरठा फार जपावा लागतो. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे.....
                               शिवाजी भोसले
                               मो. 9689964143
                         

Comments

Post a Comment