प्रेमाच्या उंबरठयावर...!

     आयुश्यात प्रत्येक व्यक्तीचं कुणावर ना कुणावर प्रेम  असतचं. ते कधी, कुठं, केव्हा, कसं, कुणासोबत, होईल हे निश्चितपणाने सांगता येत नाही. प्रेम कधी कुणावर ठरवून होतं नसतं. मला समोरच्या व्यक्तीवर प्रेम करायचं,  ... ती दिसायला खुप सुंदर आहे... तीचं रुप मला भाळतं... तीचं लावण्य मला मोहीणी घालतं... तीचं वागणं, बोलणं अगदी मनमोकळ्या स्वभावाचं आहे... तीच आपलं मत निसंकोचपणे मांडते...असं कधी ठरवुन होतं नसतं. हे प्रेम अगदी तकलादू स्वरुपाचं असतं. प्रेम हे कुणावर, केव्हाही होवू शकतं. त्यास बंधण नसतात. जेव्हा खरं प्रेम होतं तेव्हा आपलं मनचं आपणास सांगतं. खरं प्रेम काळजाच्या चोरकप्पातून बाहेर पडतं. बेगडी स्वरुपाचं प्रेम कधीच 'फिल' होतं नसतं. हे ही तितकचं सत्य.....

     खरंतरं प्रेमाची परिभाषा कुणासही करता आलेली नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रेमाची परिभाषा समजुन घेतो. तसं प्रेमही अपुर्णचं असतं. जे रात्र रात्र जागवितं... झोप उडवितं... आभासी स्वप्न पहायला लावतं... मनातल्या मनात हसायला लावतं... नको त्यावेळी आठवण काढतं... स्वविचारात गुंग ठेवतं... आवडीचं गाणं गुणगुणायला लावतं...स्वत:च्या धुंदीत राहतं... स्वत:च्याचं कल्पनेतं वावरतं... नयना समोर तिचं चित्र रंगवितं... एकटचं बडबडायला लावतं... इतरांना 'स्वत:ला वेड' म्हणायला लावतं... स्वत:पासून दूर घेवुन जातं... काय यालाचं तर प्रेम म्हणायचं असतं.

     प्रेम व्यक्त कसं करायचं हा प्रत्येक प्रेमी युवक - युवतीसाठी यक्ष प्रश्न असतो. प्रेम तर होतंचं पण... सांगायच कसं? हा सर्वात मोठा अडथळा ठरतो. आपण सांगाव आणी त्याने/तिने नकार द्यावा? असं झालं तर काळीज तुटतं. पहिलं प्रेम हे प्रत्येकाचं सत्यचं असतं ते अगदी काळजातून निघालेलं असतं. पण ते व्यक्त होण्याइतपत धाडस तरी त्या प्रेमीविरांमध्ये तेव्हा नसतं. मनाचा पहिला हुंदकार काळिज कप्पातून निघतो. एकमेकांकडे पाहून हसणं... डोळ्यानी इशारती करणं... निशब्द बोलणं... हे दोघांनाही कळतं. पण सांगायचं कुणी?... तु सांगाव...कि मी सांगाव... अशा द्विधास्थित मन अडकतं. दोघांच्याही मनात प्रेम दडलेलं असतं पण व्यक्त कसं करावं. हेच कळत नाही. दोघांनाही वाटत त्यानं/तिनं व्यक्त करावं. पण धाडस कुणाचचं होतं नसतं. 

    प्रेमात पडलं कि सावरणंही जमतचं. थोडसं धाडस करून.प्रेम व्यक्त करावचं लागतं. एकमेकांना कळतं कि तो/ती माझ्यावर प्रेम करते. पण सांगत कुणीचं नाही. दोघांनाही व्यक्त व्हावंसं वाटतं. पण कसं... हेच नेमकेपणानं कळत नाही. काळजात दडलेल्या भावना कळलेल्या असतात. त्या प्रकट करणं तेवढंचं कठिण असतं. होकार द्यावा कि नकार... मनात घर करून बसतं. काहींचं प्रेम व्यक्त होतं तर काहिंच तसचं अव्यक्त राहतं. व्यक्त झालेलं प्रेम खुलतं... बहरतं... फुलतं... आणी अव्यक्त झालेलं प्रेम स्वतालाचं जाळतं. मनातल्या मनात छळतं. ते व्यक्त होण गरजेचं असतचं. मग ते आपण कुठल्याही स्वरुपाने केलं तरी व्यक्त होतचं ना... होकार किंवा नकाराने मन व्याकुळलेलं असतं. प्रत्येकाचं प्रेम व्यक्त करण्याचं स्वरुप वेगवेगळं असतं. ज्यांच्या मनात जसं आलं तसं ते व्यक्त केलं जातं. 

     एकवेळ प्रेम व्यक्त करण्याचं धाडस केलचं तर... कसं सांगाव तिला कि "माझ तुझ्यावर मनापासून प्रेम आहे... "तु मला खुप आवडतेस...." "आप मुझे अच्छे लगने लगे...."  प्रेम व्यक्त करायला खुप सामर्थ्य लागतं.  कुणी जावून थेट सांगतं काळजातिल भावना... कुणी डोळयांच्या नाजुक इशा-यानी सांगत... कुणी मनातिल भावना छोटयाशा कागदावर उतरवुन सांगत... कुणी मित्र मैत्रिणीच्या साह्याने सांगतं... कुणी मोबाईलच्या साह्याने, मॅसेजने सांगत... आपलं प्रेम आहे... हे कुठल्याही पद्धतीने सांगितलं, व्यक्त केलं तरी चालतं फक्त भावना पोहचविणं तेवढ महत्वाचं असतं. आधुनिकतेच्या काळात तर फेसबुक, व्हॉटसअप यावरही प्रेम व्यक्त व्हायला लागलं. पुर्वीसारख प्रेम आता उरलयं तरी कुठ...?

     हे सर्व प्रेमाच्या उंबरठ्यावर असलेल्यांनाचं कळतं. हा उंबरठा धाडसानं ओलांडला कि मन आनंदात न्हाहुन निघतं. तिच्या एका होकारास आतुरलेलं असतं हे मन... व्याकुळ होतं... जिव कासाविसं होतो... तिनं 'हो' म्हणावं इतकचं या निरागस मनास अपेक्षित असतं. कधी एकदाचा होकार मिळतो या आशेने मन तिच्याकडे लावुन.बसलेलं असतं. त्याकरीता असलेली तळमळ ज्यांची त्यांनाचं माहिती असते. 'आय लव्ह यु....' हे अधुरे शब्द बोलण्यासाठी मनाची खुप तयारी करावी लागते. आणी एकदा या अडिच शब्दाला तिने शब्दबद्ध केलं कि मन आनंदुन निघतं. जगातिल सर्व आनंद तिच्या एका शब्दात दडलेले असतात. तिच्या मुखातुन निघालेला 'एक होकार' दहा हत्तीचं बळ देवून जातो. हे प्रेमाच्या उंबरठ्यावर घडतचं.....
                                  @ शिवाजी भोसले                                                           मो. 96 89 96 41 43

Comments

Post a Comment