माणसानचं जगणंचं समाजाच्या चाकोरीतल... हि चाकोरी सोडून माणसांना जगताचं येत नाही. या चाकोरीबद्ध चौकटीला धरुनचं समोर जावं लागत. प्रत्येकाच्या जगण्यासाठी समाजाची ही चाकोरी म्हणजे काटेरी कुंपणचं असते. या कुंपणास थेट तोडताही येत नाही. मोडताही येत नाही. हे कुंपणचं माणसाला संकोचित स्वरुपाचं जगायला शिकवित. त्यात नाती गोती, व्यवहार, संबध, सहवास, आपुलकी म्हटलं तर अधिकच कोडयात पडावं लागत. मग आम्ही कराव तरी काय? हा ही प्रश्न नव्याने उभा राहतो.
समाजात जगत असतांना कळत-नकळतपणे अनेक नात्याची बंधन पडतात. हि बंधनही अगदी संकुचित स्वरुपाची असतात. त्यात अडकुण माणसाला जगताचं येत नाही.परंतु तो जगतचं असतो. हि बंधण मोडाविशी वाटतात पण मोडता येत नाही. अखेर त्यास नात्याचं कुंपण आडवं येतना.... या नात्याच्या कटकटित न पडलेलं बंर असं प्रत्येकास वाटत. रक्ताची नाती हि एकप्रकारे लादलेलीच असतात. परंतु स्नेहाच्या, आपुलकिच्या, प्रेमाच्या, मैत्रीच्या नात्यांची निवड एकमेकांवर आधारलेली असतात.
हि नाती निर्माण होत असताना कसलाही विचार आपण करत नसतो पण काही व्यक्ती या नात्यास बरेच गैरसमज करुन घेतात. त्यात मैत्रीच नातं आणि त्यातल्या त्यात मुला मुलींचं नातं म्हटल तर न बोललेलचं बर.... मि तुझ्यापेक्षा वयानी बरीच मोठी आहे... माझी मुल तुझ्याएवढी येतात... आपल्या नात्याला लोक काय म्हणतिल?... माझ्या वयक्तिक भरपुर अडचणी आहेत... अशी बरीच वाक्य आजकालची स्त्री- पुरुष मोठया प्रमाणात बोलतांना दिसतात. खंरतर नात्यातिल हे समज गैरसमज अगोदर दूर करणे गरजेचे आहे. कुठल्याही नात्यास वय, जात, धर्म याचे बंधन मुळिच नसते. हे आम्ही लक्षात घ्याव.
अरे, नातं हे निर्माण करायचं होतचं तर मि या गोष्टीला मुळीचं प्राधान्य दिल नाही मग इतरानी का दयाव? कधी कधी नात्यांचं, मैत्रीचं रुपांतर प्रेमात होत हे ही मान्य आहे. पण.प्रत्येक स्त्री-पुरुष तसाच असतो असे नाही. यापुर्वि तशा प्रकारचे अनुभव आपणास आलेले असतात. पहिले मैत्रीचा हात पुढे केला जातो. नंतर फोन मॅसेज पाठविणं, पुढे भेटायला फिरायला बाहेर जाणं. असं प्रत्येकाशी घडतचं. मग ती मैत्री फेसबुक, वाटसअप , कॉलेज कुठलीही असो. जसे अनुभव येतात तसे वागण्याचा प्रयत्न केला जातो.
काहींचं वागणं हे थोडया प्रमाणात योग्यही असतं. त्यांचे परिणाम दुष्परिणाम त्यानी केव्हातरी भोगलेले असतात. परंतु नातं निर्माण होण्यापूर्विचं असे निर्माण झालेले, केलेले प्रश्न कित्येक गैरसमज निर्माण करु शकतात.याची पुसटशी कल्पनाही आपणास आलेली नसते. प्रत्येकाला वाटतं आपण तशा प्रकारातले नाहीत. आपलं व्यक्तिमत्व, वागणं तशा पद्धतीचं नाही. असे अप्रत्यक्ष बोलुन निर्माण केलेले कित्येक गैरसमज नात्यात दूरावा निर्माण करु शकतात. हे सर्व का घडतं? याचा आपण कधी विचारचं करत नाही. आपण कधी समोरील व्यक्तिला पुर्णपणे जाणूनच घेत नाही.
प्रत्येक स्त्री-पुरुषास एकमेकांचा सहवास हवाच असतो. एखाद्या ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीसोबत आपण नातं निर्माण करायचचं कसं? किंवा सतत समोरील व्यक्तिला आपल्या नात्यातिल वयाची, जबाबदारीची, संस्काराची, पदाची आठवण करुन देणे म्हणजेचं समोरील व्यक्तिच्या मनात आपणाहून गैरसमज निर्माण करणे आहे. कुठलही नातं असो अगोदर समजुन घ्याव.त्यास सुसंवादाची जोड द्यावी. आपुलकीने कुरवाळावं. विश्वासाची जोड द्यावी. तेव्हा त्या नात्यातिल 'मुळ पवित्रता' लक्षात येते. उगाच कुणाच्याही मनात समज गैरसमज निर्माण करुन नातं तडीस नेण्याचा प्रयत्न करु नये.
एकमेकांचा असलेला सार्थ विश्वास जेवढा सत्य तेवढीच नात्यातिल पवित्रता अधिक असते. हे आम्हाला कधी कळतच नाही. नात्याच्या परीसिमा कधी कळत नकळतपणे गाठल्या गेल्याच तर त्यात दोघांचीही सत्यता असावी. सत्यता विश्वास या एकाच गोष्टीवर निर्माण झालेलं नातं हे कुठलही संकट निर्माण झालं तरीही तुटतं नाही. आपल्याला ती तुटण्याची भितीही वाटते पण ती तुटत नसतात. ती अधिक जोमाने वाढतात. त्यात सत्यता टिकविणं फार महत्वाचं! एकदा नात्यातिल.सत्यता हरविली कि समज गैरसमज होण्यास वेळ लागत नाही.
आपलं नातं टिकवावं... वाढवावं... निभवावं... असं वाटणा-या प्रत्येक स्त्री-पुरुषानी एकमेकांशी प्रामाणिक.असावं. सर्वस्व झोकुन देण्याची तयारी ठेवावी. त्या नात्याला कुठलीचं दुषणं लागत नाही. हे तिळमात्र सत्य आहे. ते नातं बहरतचं मग ते कुठल्याही स्वरुपाचं असो...........
शिवाजी भोसले
मो. 96 89 96 41 43
मो. 96 89 96 41 43
खूप छान
ReplyDeleteछान...!
ReplyDeleteछान...!
ReplyDelete