नुकताच दहावी, बारावीचा निकाल लागला आणि उत्तीर्णांच्या आनंदास उधाण आलं. निकालांची टक्केवारी बघितली तर मन थक्क होतं. ज्यांनी घवघवीत यश संपादन केलं, त्यांचं अभिनंदनचं! मात्र, अपयशी ठरलेल्यांनी हताश होणं हे मनास न पटणारं आहे. शालांत परीक्षेत हे यश संपादन करणं कौतुकास नक्कीच पात्र आहे. मात्र, या गुणांची गुणवत्ता किती, हा यक्ष प्रश्न अनुत्तरितच राहतो.
अनेकांना डोळ्यास न झेपविणारी गुणांची टक्केवारी बघितली की, आश्चर्य वाटायला लागतं. ही इतकी गुणाची टक्केवारी कशा पध्दतीनं साध्य केली असेल. कशाच्या आधारावर हे सर्व साध्य केलंय. अखेर अभ्यास हा महत्त्वाचा आहेच. अभ्यासाशिवाय तरणोपाय नाही, ते शाश्वत सत्य आहे. पण, मराठी विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळविणं हे आजवर कुणालाही शक्य झालं नाही, ते यांनाच कसं काय साध्य झालं हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न विचार कक्षेबाहेरचा आहे.
उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुण आणि गुणवत्ता... हा प्रश्न वर्षानुवर्षे चर्चिला जात आहे. परंतु, त्याचं उत्तर सहसा कुणालाही देणं साध्य झालं नाही. शालांत परीक्षेमध्ये प्रचंड गुण मिळविणाऱ्या असंख्य विद्यार्थ्याना गुणाचं हेच सातत्य कायम ठेवता येतं का? त्यांच्या गुण आणि गुणवत्तेचं तारतम्य त्यांना साधणं का कठीण जातं? दहावीच्या परीक्षेत जवळपास दीडशे विद्यार्थ्याना १०० टक्के गुण मिळाले आहेत. गुणदानाची ही कोणती पद्धती आहे हे शिक्षण मंडळाने जाहीर करावे. गणित आणि विज्ञान हे विषय सोडल्यास बाकीच्या विषयात पैकीच्या पैकी गुण कसे मिळू शकतात? किमान भाषा विषयात तरी हे अतार्किक वाटते. अशा पध्दतीने गुणांची खिरापत वाटून आपण त्या विद्यार्थ्याना आत्मतुष्टी व अति आत्मविश्वास देऊ करतो आहोत.
गेल्या काही वर्षामध्ये राज्य परीक्षा मंडळाने दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्याना गुण देऊन सीबीएसई व आसीएसई या वेंâद्रीय बोर्डाबरोबर स्पर्धा करून नक्की काय साधलं? फक्त अकरावीला विद्यालयात प्रवेश मिळवणे सोपे जावे म्हणून परीक्षेत गुणांची खैरात करणे योग्य आहे काय? पुढील स्पर्धात्मक परीक्षांसाठी त्यांना एवढे पैकीच्या पैकी गुण मिळणे कठीण व अशक्य आहे. याची जाणीव विद्याथ्र्यांना दहावीपासून का केली जात नाही? विचार करायला लावण्यासारखे प्रश्न परीक्षेतून हद्दपार केल्याने पुढे स्पर्धात्मक परीक्षा देणे या विद्यार्थ्याना कठीण जाते. कॉमर्स विभागातील सनदी लेखापाल (सीए) कंपनी सेक्रेटरी (सीएस), कॉस्ट अकांउंटिंग या परीक्षेत फक्त पास होण्यासाठी किमान पन्नास टक्के गुण मिळवावे लागतात व त्यासाठी विद्यार्थ्याना खूप झगडावे लागते. अशा व्यावसायिक परीक्षेला बसण्यासाठीची मानसिकता लहानपणापासून विचार करणाऱ्या परीक्षा देण्यासाठी सवय विद्यार्थ्याना लावणे अत्यंत गरजेचे आहे.
बुध्दीच्या अनुरूप गुण मिळणे हे केव्हाही चांगले. म्हणूनच गुणांची जीवघेणी स्पर्धा बंद व्हावी व गुणात्मक दर्जा सुधारणारी परीक्षा पध्दती यावी... पण, त्यासाठी शिक्षक, पालक, सरकार यापैकी कोण पुढाकार घेईल? याकडे अधिक लक्ष देण गरजेचं आहे.

@ शिवाजी भोसले
मो. 9689964143

Comments
Post a Comment