आपल्या देशामध्ये पूर्वीपासून काही मादक पदार्थ जसे गांजा व दारु याला समाज मान्यता आहे, असे म्हटल्या जाते. काही ठिकाणी तर मादक पदार्थ मोठ्या प्रमाणावर धार्मिक उत्सवांमध्ये सुध्दा वापरले जातात. आज दारूचे व्यसन घरोघरी पोहोचलेले आहे. मात्र, या मादक पदार्थाच्या विळख्यात तरुणाई मोठ्या प्रमाणावर सापडलेली आहे.
तरुणाईला काळ्या बाजारात नशेचे अनेक पदार्थ मिळतात. यामध्ये प्रामुख्याने गांजा, चरस, दारू, ब्राऊन शुगर, मॅड्रेक्स याचा समावेश आहे. देशामध्ये दरवर्षी तीन ते चार हजार आत्महत्या मादक पदार्थांच्या सेवनामुळे होतात व मादक पदार्थामुळे गुन्हेगारीचे प्रमाणही प्रचंड वाढते आहे. मादक पदार्थाच्या अंमलाखाली विचारशक्ती खुंटून जाते व त्यामुळे व्यक्ती गुन्हे करण्यास प्रवृत्त होतो.
तरुणाईला काळ्या बाजारात नशेचे अनेक पदार्थ मिळतात. यामध्ये प्रामुख्याने गांजा, चरस, दारू, ब्राऊन शुगर, मॅड्रेक्स याचा समावेश आहे. देशामध्ये दरवर्षी तीन ते चार हजार आत्महत्या मादक पदार्थांच्या सेवनामुळे होतात व मादक पदार्थामुळे गुन्हेगारीचे प्रमाणही प्रचंड वाढते आहे. मादक पदार्थाच्या अंमलाखाली विचारशक्ती खुंटून जाते व त्यामुळे व्यक्ती गुन्हे करण्यास प्रवृत्त होतो.
महाराष्ट्र राज्यात मादक पदार्थ सेवनामुळे होणाऱ्या आत्महत्या देशात सर्वाधिक आहेत. चिंतेची बाब म्हणजे नशा करण्याचे वय दिवसेंदिवस कमी होत आहे. शाळकरी मुले सुध्दा नशेच्या आहारी जात आहेत. प्रसार माध्यमांमधून मादक पदार्थाची कळत नकळत जाहिरात होत असते तसेच चित्रपटांमधून नायक मादक पदार्थाचे सेवन करताना दाखवतात, त्यामुळे तरुणांवर वाईट परिणाम होतो.
मादक पदार्थाचे शरीरावर फार भयंकर परिणाम होतात. शरीरातील प्रत्येक अवयव नशेमुळे प्रभावित होतो. इंद्रियाची काम करण्याची क्षमता हळूहळू कमी होते, सर्वात जास्त वाईट परिणाम मेंदूवर होतो व निर्णय क्षमता व समजण्याची कुवत नष्ट होऊन जाते. परिणामी, मादक पदार्थाचे सेवन करणारी व्यक्ती समाजापासून दूर जाते व कुटुंबावर एक प्रकारचे ओझे बनून जाते, यामध्ये प्रचंड आर्थिक व कौटुंबिक नुकसान होते.
मादक पदार्थाच्या सेवनावर आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवर विविध कायदे अस्तित्वात आहेत. मादक पदार्थाची तस्करी हा एक मानवतेविरुध्द गंभीर गुन्हा ठरवण्यात आला आहे. भारतामध्ये तसेच महाराष्ट्रातही अनेक कडक कायदे आहेत व त्यात शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु, विविध कायदे असूनसुध्दा अनेक तरुण व्यसनाला बळी पडतात. अशा तरुणांचा उपचार करण्यासाठी विविध प्रकारची औषधे व व्यसनमुक्ती केंद्रे आहेत. अशा तरुणांना व्यावसायिक पद्धतीने समुपदेशन व औषधोपचार करण्यात येतात.

मादक पदार्थाचा विळखा फक्त कायदे बनवून सुटणारा नाही, तर यामध्ये समाज, कुटुंब पूर्ण ताकदीनिशी या लढाईत उतरायला हवे आणि मला विश्वास आहे आपण पुन्हा एकदा तरुणांना नवचैतर्थाचा विळखा फक्त कायदे बनवून सुटणारा नाही, तर यामध्ये समाज, कुटुंब पूर्ण ताकदीनिशी या लढाईत उतरायला हवे आणि मला विश्वास आहे आपण पुन्हा एकदा तरुणांना नवचैतन्य व आत्मविश्वास देऊ शकतो. याकरिताच २६ जून हा दिवस १९८७ पासून आंतरराष्ट्रीय मादक पदार्थविरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो.
-- शिवाजी भोसले
मो. 9689964143
Comments
Post a Comment