इतिहासाचं सातत्याने पावलोपावली विपर्यास करण्यात आलेलं आजवरच्या इतिहासांनं सिध्द केलयं. इतिहास तत्कालीन स्थितीत वास्तव वाटत असला तरी भविष्यात त्याचं सत्य रुप समाजासमोर येतचं. हेही सिध्द झालेलं आहे. कुठल्याही इतीहासाचं सत्य रुप समाजासमोर आलं नसावं असं आजवरही होवू शकलं नाही. मात्र त्याकरीता इतिहासाच्या मुळापर्यंत शिरणं गरजेचं असतं. त्याशिवाय सत्यता समोर येत नाही. प्रस्थापित इतिहास लेखकांनी लेखणीचा गैरवापर करत चुकीचा इतिहास प्रचलित केल्याचे अजून एक उदाहरण समोर आलं आहे. ते म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक कोण...? भाऊसाहेब रंगारी की लोकमान्य टिळक? हा वाद दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र मोठ्या प्रमाणात पाहवयास मिळत आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक कोण? याबाबत संदिग्धता निर्माण झालेली आहे.
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरवात करुन यामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान दिलं असल्याचं आजवर सांगण्यात आलं, मात्र ते वास्तवतेला धरुन नसल्याचं आज लक्षात आलं आहे. इतके दिवस भाऊसाहेब रंगारी हे नाव आणि चरित्र उपेक्षेच्या गर्तेतचं अडकलेलं होतं. पण आता उपेक्षेचा काळ संपला आहे. उशिरा का होईना सत्य समाजासमोर आलं आहे. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वाढिसाठी हातभार आवश्य लावला आहे. ते नाकारताही येणार नाही. टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिकतेचं रुप दिलं हे शाश्वत सत्य आहे. मात्र त्यांनाचं सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक संबोधन हे मुर्खपणाचं लक्षण वाटतं.
छत्रपती शिवरायांची शिवजयंती ही लोकमान्य टिळकांनी सुरु केली हे कित्येक वर्ष इथल्या समाजाच्या मस्तकावर मारलं गेलं तेचं सार्वजनिक गणेशोत्सवाच्याही बाबतीत घडविलं जात आहे. महात्मा जोतीराव फुलेंनी १८६९ला शिवसमाधीचा शोध घेत शिवजंयतीला सुरवात केली. शिवरायांवर जागतिक किर्तीचा पहिला पोवाडा लिहला आहे. भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरवात केल्याचं इतिहासाच्या पानोपानी आढळून येतं. हे इतिहासाचं वास्तव रुप स्विकारणं गरजेचं आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाची १२५ वर्ष ओलांडली गेली आहेत. मात्र यंदाचं वर्ष हे १२६वे वर्ष असल्याचं भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे पदाधिकारी सांगत आहेत आणि ते सत्यही आहे. यापुर्वीच भाऊसाहेब रंगारी मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सवाची १२५ वर्ष साजरी केली आहेत. याबाबत त्यांनी सरकारला संदर्भ पुराव्यासह पत्रव्यवहारही केला मात्र त्यांना कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी ‘ट्रस्टची इमारती उडवून देवू... ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा दाभोळकर करु’ अशा निनावी धमक्या देणं हे संयुक्तीक वाटत नाही. सत्याचा गळा घोटण्याचा हा प्रकार तुघलकी वाटायला लागतो. याबाबत बरचंसं मोठ्या प्रमाणात वातावरण तापलं गेलं आहे. खरतरं इतिहासाची पान चाळतांना असं लक्षात येतं की भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ केल्याचं आढळुन येतं. मात्र ते इथल्या व्यवस्थेला मान्य करायचं आणि समाजालाही मान्य होवू द्यायचं नाही असचं या प्रकरणावरुन दिसून येत आहे.
भाऊसाहेब रंगारी मुळातच एक क्रांतीकारक... अनेक क्रांतीकारक कारवायामध्ये त्यांनी सहभाग घेतला. स्वत:च्या घरात बंदूका, तलवारी शस्त्रसाठा ठेवला. क्रांतीकारकांना लपण्यासाठी भुमीगत भुयार निर्माण केलं. आपल्या वाड्यामध्ये गुप्तपणे अनेक क्रांतीकारकांना शस्त्र चालविण्याचं प्रशिक्षण दिलं. त्यांनी इंग्रजांविरुध्द पुकारलेलं बंड हे वखाण्याजोग होतं. आजही ऐतिहासीक शनिवार वाड्यांच्या पाठीमागे त्यांचा वाडा पहावयास मिळतो. इथेच त्यांचा शालू रंगविण्याचा व्यवसाय होता त्यामुळे त्यांना रंगारी हे नाव पडलं. मुळात त्यांचं नाव भाऊसाहेब लक्ष्मण जावळे हे आहे. त्यांनी शालू रंगविण्याच्या व्यवसायाबरोबर वैद्याचंही काम केलं. देशभरातील रुग्ण त्यांच्याकडे येत असतं. अनेक क्रांतीकारकांच्या औषधोपचारही येथेचे केला जात असायचा.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात जुलमी इंग्रजी राजवटीविरुध्द लोकांच्या मनात अधिक असंतोष वाढिस लागला. लोकांनी ठिकठिकाणी उठाव सुरु केलेत. मात्र याचं स्वरुप खूपचं मर्यादित होतं. याकरीता ब्रिटिश सरकार विरोधी चळवळीमध्ये अधिकाधिक लोकांना सहभागी करुन घेता यावं याकरीता भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली. तत्पुर्वी भाऊसाहेब रंगारींनी ही संकल्पना नानासाहेब खासगीवाले, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, गणपतराव घोटावडेकर, लखू शेठ दंताळे, भोरकर वकील, दगडूशेठ हलवाई, खंडोबा तरवडे, मामा हसबननीस, नानासाहेब पटवर्धन आदींसह सहकार्यांची बैठक घेवून मांडली. त्यांना ही संकल्पना अधिक भावली. पुढे १८९२ ला आपल्या वाड्याच्या प्रांगणात सार्वजनिक गणपती बसविले. सोबतचं गणपतराव घोटावडेकर, नानासाहेब खासगीवाले यांनीही गणपती बसविले. त्यावेळी एकुण तीन गणपती बसविल्याचं समोर येत आहे. या सार्वजनिक गणेशोत्सवाने लोकांना एकत्रीत करणं सहज शक्य होवू लागलं. यामध्ये १९९३ साली गणपतीच्या संख्येत अधिक वाढ झाली. लोकांच्या एकत्रीपणाला चळवळीचं स्वरुप प्राप्त झालं. यातुनच प्रेरणा घेत टिळकांनी १९९४ ला सार्वजनिक गणेशोत्सवाला सर्वव्यापी स्वरुप देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी यास मोठ स्वरुप प्राप्त करुन दिलं हे नाकरता येणार नाही.
भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ केल्याचे अनेक पुरावे आपणास पहावयास मिळतात. महाराष्ट्र शासनाच्या स्वातंत्र सैनिकांच्या गॅझेटमध्ये चरित्र कोश खंड ३ मध्ये भाऊसाहेब रंगारी १८९२ साली सार्वजनिक गणपती उत्सव सुरु केल्याचे कार्य' असा उल्लेख आढळून येतो. शासनाने प्रकाशित केलेली गॅझेट, ग्रंथ ही प्रथम पुरावा मानलीचं जातात. त्यामुळे हा उल्लेख ग्राह्य धरणं गरजेचं आहे. त्याशिवाय लिम्का बुक ऑफ रेकार्डमध्ये १२६ वर्षाचे ठभाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळ' अशी नोंद केली आहे. टिळकांचे सहकारी न.चि. केळकर यांनी लिहलेल्या लोकमान्य टिळक यांच्या चरित्र ग्रंथातील पान क्र. ४२० वर १८९४ पुर्वी हा उत्सव सुरु करण्यात आल्याचं स्पष्ट केलेलं आहे. रमिंदर कौर यांनी लिहलेल्या 'Performative Plolitics and the cultures of hinduism' या ग्रंथात सुध्दा पान क्रमांक ३५ ते ३८ वरही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्ववाची सुरवात केल्याचा उल्लेख आहे. टिळकांच्या नंतरचे केसरीचे संपादक असलेले ज.स. करंदीकर यांनी लिहलेल्या 'श्रीगणेशोत्सवाची साठ वर्ष' या पुस्तकात पान क्रमांक १ ते ३ वर भाऊसाहेब रंगारी यांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. त्याशिवाय लोकमान्य टिळकांनी स्वत: २६ सप्टेंबर १८९३ च्या केसरीच्या अंकात अग्रलेखामध्ये ‘सालाबादपेक्षा यंदा गणेशोत्सवास अधिक सार्वजनिक स्वरुप आले असुन ज्या गृहस्थांनी खटपट केली त्यांचे आभार मानले पाहिजेत.’ असं गणेशोत्सवाचं कौतुक केलं आहे. तसेच देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावण्याची सुरुवातही भाऊसाहेबांनीच केली आहे.
(
स्वत:चं मृत्यपत्रही भाऊसाहेब रंगारी यांनी पुर्वीच बनवून घेतलं होत. १९०५ ला त्यांचं निधन झालं. त्यांनी स्वत:च्या मिळकतीचे ७ वाड्यांसह आपली संपत्ती सार्वजनिक गणेशोत्सव साजरी करण्याकरीता दान केली असल्याचं मृत्यूपत्रात नमूदही आहे. आकाशाला गवसणी घालणार नेतृत्व समाजासमोर येणं गरजेचं आहे. भाऊसाहेबांचा इतिहास बराच मोठा आहे. अजून बराच उलगडा होणे बाकी आहे. त्या दिशेनं इतिहास अभ्यासक, संशोधकांनी लेखणी हाती घेणं गरजेचं आहे.

शिवाजी भोसले
मो : 9689964143

Comments
Post a Comment