स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे र्शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षा तर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आला आहे. या वर्गाला दोन वर्षे पूर्ण झाली असून, निबंध, वकृत्व सामान्य ज्ञान स्पर्धेचा अनेक युवकांना लाभ होत आहे. यामध्ये ५० हून अधिक अधिकायांनी मार्गदर्शन केले असुन तरूणांची वाटचाल गुणवंताकडून प्रज्ञावंताकडे अशी होत आहे.
सध्याचे युग हे स्पर्धेचे असून, यामध्ये टिकण्यासाठी शहरीभागासह ग्रामीण भागातील तरुणांना सदुपयोग घेता यावा याकरिता जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हा प्रशासनाच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षामार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आला होता. ५ जुलै २०१५ ला करण्यात आलेली ही सुरुवात आज अनेक विद्याथ्र्यांना मार्गदर्शनाची केंद्रबिंदू वाटत आहे.
आजवर राष्ट्र निर्माणात युवकांसमोरील आव्हाने, भारत कोणत्या समस्यांना तोंड देत आहे- आर्थिक की नैतिक, सोशल मिडिया व भारतीय युवकांची मानसिकता, डिजिटल इंडिया- ग्रामीण विकासाची गुरूकिल्ली, भविष्यातील जलसंकट जलयुक्त शिवार योजनेमुळे टाळता येऊ शकेल? क्रीडा क्षेत्रात भारत जगज्जेता कसा होऊ शकेल आदी विषयासह शंकरपटाचे चित्र व पाणीटंचाईच्या संदर्भात चित्रफीत यावर निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली.
भारत २०-२० : एक महाशक्ती, डिजिटल इंडिया भारताच्या विकासाची गुरुकिल्ली ठरेल काय?, भारताचे परराष्ट्र धोरण, खासगीकरण व भारताचा विकास, स्वच्छ भारत अभियानाने सुंदर भारत होईल काय?, कडक कायदे नैतिकता निर्माण करू शकतात?, स्त्रीचे आजचे सामाजिक स्थान व तिच्या पुढील आव्हाने, पाचशे व हजाराची नोट चलनातून रद्द करण्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, स्मार्ट शहर स्मार्ट राष्ट्राचे प्रतिबिंब ठरेल काय?, मी पंतप्रधान झालो असतो तर आदी विषयांवर वकृत्व स्पर्धा घेण्यात आली तसेच वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी, दीर्घोत्तरी प्रश्नांसह ७ वेळा सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये अनेकांनी सहभाग नोंदवून विविध बक्षिसेही प्राप्त केली.
आजवर दोन विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षेच्या उच्च तयारीकरिता मोठ्या शहरात पाठविण्यात आले आहे. या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाकरिता प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेला किंवा १ तारखेला निबंध, वकृत्व , सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात येते, तर ५ तारखेला बक्षिसांचे वितरण करून विविध अधिकारी मार्गदर्शन करतात. यामध्ये आजवर ५० हून अधिक अधिकारी वर्गांनी मार्गदर्शन केले आहे.
याप्रसंगी प्रश्नमंजूषा कार्यक्रमही राबविण्यात येतो तसेच विद्याथ्र्यांना उद्भवलेल्या अनेक प्रश्नांचे निरसनही करण्यात येत असते. याकरिता जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. प्रकाश अंधारे, स्वप्निल ओळंबे आदी सातत्याने पुढाकार घेत आहेत.
- शिवाजी भोसले
मो. 9689964143

Comments
Post a Comment