अकल्पित बेधुंद धारा ! कोसळली आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चैतन्य संचारलं... पावसाची सर प्रत्येकास वेड लावणारी... सृष्टीतील चराचराच्या जिव्हाळ्याचा विषय... तो नाही आला तर बैचनं होतं मन... आस लागते त्याच्या येण्याची... पावसाची सर येते.. कोसळते.. मने तृप्त होतात.. सृष्टीस नवसंजीवन मिळतं.. मनास लागलेली आस विरते, आणि गारवा निर्माण होतो... पाऊस येणार फक्त महत्त्वाचं असतं. तो येतो ही क्षणात... सर्वत्र चिंबचिंब करून निघूनही जातो, पण प्रत्येकाच्या तप्त मनात सुप्त साद घालून ओढ निर्माण करतो. सर्वांना सतत हवाहवासा वाटणारा पाऊस कित्येकांच्या हृदयावर अधिराज्यचं गाजवितो.
पावसाची सर तास दोन तासाची... पण मनास प्रेरित करणारा गारवा अविरत असतो. त्याची प्रत्येक झुळूक मनाला उभारी देते. अंगास शहरा निर्माण... देहांत कापून उठतो... थोडसं कापरं भरत... अंगात जगण्याचं बळ संचार... बेधुंद व्हावसं वाटतं... सारा क्षणाचा खेळ मोहित करून सोडतो. हे सर्व जाणवायला, अनुभवायला आधी पाऊस वेडं व्हावं लागतं. पावसासोबत खेळणं.. हुंदडणं.. प्रत्यक्ष साकाराव लागतं. आणि सर्व विखुरलेले क्षण एकवटून मनमुराद जगावं लागतं. आणि सोबतीस 'ती' असली... जगण्याचं भान हरवतं.
मनपाखरू या वेलीवरून त्या वेलीवर स्वच्छंद उडतं. त्याला कुठलीच परिसीमा बंधन नसतात. जणू आपल्याजवळ स्वर्ग अवतरला, हा आभास होऊन कडाडून मिठी मारावी. चिंब झालेल्या अंगास तिच्या मनाची उभारी द्यावी. दोघातील अंतरात गारवा शिरकाव करण्यास जागाच नसावी. पूर्णता बेधुंद व्हावं, जगण्याचं भानचं नसावं. मनाच्या चोर कप्प्यात तीच अधिराज्य असावं. हि मिठी स्वर्गसुखाहूनही आनंदाची वाटते. सर्व क्षण या शब्दाशी दुबळे ठरतात.
... तीही डोळाभरून चिंब झालेला चेहरा हृदयात साठवत होती. या स्वर्गसुखी बहु पाशातून दूर करणारे कोणीच नसावं. असं तिला मनोमन वाटायचं. दोघांचंही हृदय पडणाऱ्या थेंबाप्रमाणे धडधडत होतं. पण इतरांची कुठलीच तमा मनात बाळगलेली नव्हती. चिंब झालेल्या गारव्यानं आणखीनच भर घातली. मिठी आणखीनच घट्ट घट्ट होत गेली. कुशीत तिच्या मिळतो, माझ्या आयुष्याचा तिमीर... केसातून अलगत बोटं फिरवताना अंगात रोमांच उभा राहतो. मखमली स्पर्श तिच्या बोटांचा पुरेसा आहे स्वर्गाला धरतीवर आणण्याला...
हृदयाचे ठोके आता गतिमान झाले, त्याचा अस्पष्ट आवाज दोघांच्याही मनात धडकी भरवित होता. आजूबाजूला थोडीशी कुजबुज चाललेली, पण ती विलक्षण रमून गेली. दोघांशिवाय दुसरं जग उरलं नव्हतं. तो गारवा हि निशब्द होता अन आम्हीही... पण दोघांच्या हृदयात लागलेली आग तो पूर्णत: ओळखून होता.
... देशील कारे मला साथ? ती मनवेडी ओठातच पुटपुटायची, पण कसं सांगावं, की मला तुझीच साथ हवीय जन्मोजन्मी... या मिठीतला गोडवा देशील ना रे? पण कसं सांगावं, हे बाहू तुझ्याचं मिलनासाठी नेहमी आतुरतील... या गारव्याच्या पहिल्या झुळकेनं पावसाची सर येण्याची शपथ घेतली, तशा आणाभाका देशील ना रे? पण नेमकं कसं सांगावं, की तुझ्याशिवाय मी कुठली शपथ घेऊ शकत नाही. तिचं निशब्द राहणं... गारवा सर्व सांगत होता. जणू तोही माझा सखा झाला असावा. हे सर्व कित्येकांच्या नजरेनं हेरलं होतं.
आता आजूबाजूची कुजबुज थोडी वाढली आणि मिठी सैल झाली. क्षणात अंगाला दुरावा आला. आपलं काही तरी गमावल्यासारखं वाटलं. पण वेड्या मनास समजावणार तरी कोण? हा पोरखेळ नक्कीच नव्हता. क्षणात विसरून जाण्याचा... तर ती साद होती दोन निस्सीम जीवांची... एकमेकात गुंतलेल्या एक मनाची... जीवनाच्या संगतीने सोबत घेतलेल्या आणाभाकांची... विलक्षण ओढ लागलेल्या दोन प्रेमी पाखरांची... हे मिलन होतं हरविलेल्या मनाचं...
... ती आता दूर झाली, आपल्या डोळ्यात माझं चिंब झालेलं अंग साठवतं. तिच्या मनाचा ठाव घेणं कठीण झालं. थोडीशी लाजली... स्मितहास्य केलं... डोळ्याच्या कडेवरून पाहतच राहिली. आणि क्षणात दूर निघून गेली. ती जाताना तिरकस नजरेनं मागे वळून पाहायची. माझ्याही मनात खूप कालवाकालव चालली... पण व्यक्त करण्यास कोणीचं नव्हतं. ती व्यक्त करावीही कशी? तिचं निशब्द राहणं मनासं आठवायचं. डोळयात एक अधुर स्वप्न साठवायचं. जणू एका फुलपाखराचं हे जगणं असावं.
आता तो गारवाही हळूहळू कमी होवू लागला. आणि माझंचं मला भान येवू लागलं. त्या निशब्द गारव्यानं मनाचं जगणं समृध्द केलं. आता तो गारवाही निशब्द... आणि तिची आठवणही निशब्द...!!!
🌀 शिवाजी भोसले
+919689964143

Comments
Post a Comment