सायंकाळची वेळ... मंद हवेचा गारवा उघडया अंगास चांगलाच झोंबत होता. हवेतील गारव्याने एकरूप व्हावं... शिथिल मनाची हुरहूर दूर करतं. आकाशामध्ये शुभ्र ढगांची गर्दी दाटली पण हवेतील झुळूक मनास वेड लावत होती. तप्त लावारसापासून कोंडणाऱ्या अंगाला थंडगार हवेचा दिलास मिळत होता.
वसंताचे बोचरे वारे अंगास शहारून टाकतं. सर्वच मनरमणी होत असतांना अचानक आकाशात काळे ढग दाटून आले. पाखरे परतीच्या प्रवासाला निघाली. सुर्य ढगांच्या आड लपल्यामुळे काही क्षणासाठी आपलं अस्तित्व गमावून बसला होता.
खरतरं सायंकाळ झाालीच नव्हती. पण अचानक शुभ्र ढगांच अस्तित्व दडपल्या गेलं. मनही त्याच्यासारखं झाकोळून गेलं... त्याची भावना कळत नव्हती... कुठतरी दुसऱ्याच्या मनात गुंतलयं... त्याच्या भोळेपणाला थारा कुणीच देत नव्हतं. मनात कालवाकालव अधिकच वाढू लागली... अन अचानक मेघ बरसू लागले. पावसाची रिमझीम सुरू झाली. क्षणात होत्याचं नव्हतं झालं...
पहिल्या पावसात मनसोक्त भिजत रहावं. असं मनास वाटत होतं. पावसाची सरी आता जोमाने धरतीवर बरसू लागली. बेभान कोसळणाऱ्या पावसानं मनाला वेडं लावलं होतं. त्याच्यासोबत खेळण्यास तो सतत खुणावू लागलायं. मनही वेड होत होतं त्या पहिल्या सरीनं...
पावसानं असं अचानक येण्याणं मनातील स्पंदने खालीवर होत होती. त्याचं मुसळधार कोसळण मोहरून टाकत होतं. पावसात भिजण्याची इच्छा अनावर झाली. तिच्यासोबत मनसोक्त भिजावं असं मनोमन वाटतं. कारण तीही माझ्यासारखीचं पाऊसवेडी... तीला पाऊस खूप आवडायचा आणि मला पाऊसात ती...
लगेच घरातून बाहेर पडलो. बाहेर पडताच उनाड पावसाचे थेंब काळजाला छेद करत असतं. अन.. त्याचं काळजाला तिच्या भेटण्याची ओढ लागली... तिच्याही मनास माझाी ओढ लागली. टपोऱ्या थेंबानी अंग चांगलचं चोपुन निघालं. काळीज थरथरत होतं... शरीराचा एकही भाग चिंब होण्याचा राहिीला नव्हता. सोबत मनही चिंब झालं होतं.
पहिल्या वहिल्या पाऊसात भेटण्याच्या ओढीने आनंद गगनात मावत नव्हता. आनंदाच्या लाटा मनाच्या सागरात अधिक उचंबळत होत्या. तिच्याही मनात असंचं काही चाललं असावं. ती अनासक्त नेत्रांनी पाऊस न्हाहाळत होती. डोळयात साठवत होती... पुर्णता स्वप्नमय झाली होती. उरात पेटणारा वणवा दोघांच्या भेटीनं विझणार होता. कशाचंचं भान उरलं नव्हतं. समोरच्या झाडावर बसलेल्या पक्षांचं अलींगण तिच्या डोळयात दाटून आलं. मनाच्या अंतऱ्यात काहूर माजविला पाऊसानं...
तिच्या स्वप्नांची दुनिया पावसात अजूनच गडद होत होती. जणू पाऊसासोबत तिचा संवादच सुरू होता. ऑंखो ही ऑंखो में....
शिवाजी भोसले अकोला
मो. 9689964143

Comments
Post a Comment