मोबाईलचं बंधन गरजेचं

माणसाचं अवघं विश्व मोबाईलनं व्यापून टाकलयं. अगदी  पहाटेपासून ते उशीरा रात्रीपर्यंत माणूस मोबाईलच्या आसपास घुटमळत असतो. अनेकांना तर सकाळीच उठल्या उठल्या मोबाईल तपासाची सवय जडलेली असते. खरंतर माणसांनी सकाळी उठावं प्रात:विधी उरकावा, दैनंदिन कामास प्रारंभ करावा, व्यायामाची जोड द्यावी, मात्र असं होताना फारस दिसून येत नाही. जणू त्या  मोबाईलच्या साक्षीनं दिवसाची सुरूवात होत आणि दिवसाचा शेवटसुध्दा  मोबाईलनंचं होतोय, हे कुठतरी बदलणं आवश्यक आहे.

अनेकांना तर सकाळी उठल्याबरोबर हातामध्ये मोबाईल हवा असतो,  इतरांना गुड मॉर्निंग, प्रेरणादायी संदेश टाकले जातात आणि दाखविलं जातं की, आजच्या काळातही मी किती सकाळी उठतोय, उठतेय. मात्र खरंच त्या व्यक्तीने अंतर्मुख होणे गरजेचे आहे. त्यांनी आत्मचिंतन करावं. आपण सकाळी उठतो आणि हा आपला अमूल्य वेळ वाया घातवतोय का? स्वत:चं आरोग्य, उत्साह, प्रसन्नता यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक असतांना कृत्रीम साधण्यासोबत वेळ घालवणं योग्य वाटतयं का? सकाळीचं उठण आणि इतरांना मॅसेज, संदेश पाठविणं हे कुठे तरी मानवी अधोगतीचे लक्षण वाटायला लागतं.

माणसांनी सकाळी आवश्य उठावं आणि आपला वेळ सत्कारणी मार्गी लावावा, असं मनोमन वाटतं. मात्र केवळ सकाळी उठण्याचा बहाणा करायचा आणि हातामध्ये मोबाईल घ्यायचा, इतरांना संदेश, मेसेज पाठवायचे. इतरांचे मॅसेज, संदेश तपासायचे, त्यांना उत्तर द्यायची आणि झोपून जायचं, ही अनेकांची वास्तविकता आपल्याला नाकारता येणार नाही.

मोबाईल हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे आणि हा अविभाज्य घटक कुठेतरी बाजूला सारावा लागणार आहे. मोबाईल शिवाय माणसाला जगणं शक्य होत नाही, मी खरंच मोबाईल शिवाय जगू शकतो का ? हा प्रश्न विचारला प्रत्येकांनी स्वत:ला विचारणं आवश्यक आहे. जेव्हा स्वत:च्या मनाला प्रश्न विचाला जाणार तेव्हा याचं उत्तर नक्कीच नकारार्थी यायला लागतं. असं का होत असेल ? माणूस हा  स्वत:चं कुटूंब, घरातील माणसं, नातेवाईक, मित्र मैत्रीणी, हितचिंतक, आप्तपरीवार यांना  सोडून केवळ मोबाईलच्या आहरी जातोय. तर मोबाईल हा इतका जवळचा बनलाय की, आपण सर्व प्राधान्यांपेक्षा मोबाईलला अधिक प्राधान्य देतोय म्हणूनच...

सध्या तर लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत मोबाईलचे वेड लागलं आहे. मोबाईलशिवाय काहींचा वेळच जात नाही, असं झालयं. मोबाईल लहानांवर हावी तर मोठ्यांवर दुष्परिणामकारक ठरतोय. व्यक्तीनं मोबाईलचा आवश्य वापर करावा, मात्र  मोबाईल वापरतांना त्याचं तारतम्यसुध्दा बाळगावं. केवळ  मोबाईलच्या माध्यमातून सर्व काही साध्य करता येवू शकतं, हेचं डोक्यात ठेवलं तर कालांतराने त्याचं फळसुध्दा भोगावं लागेल. हे केव्हाचं नाकारता येत नाही.

मोबाईल हे संवादाचं माध्यम ठरावं. दुसंवाद तर माणसामाणसांत होतोय. त्यामुळे  व्यक्तीच्या जीवनात मोबाईलची उपयुक्ता किती? याचा विचार करून मोबाईल वापरणं आवश्यक आहे. त्यापेक्षा अधिक मोबाईलचा वापर झाल्यास होणाऱ्या दुष्परिणामांना सामोरं जावंचं लागेल, यात तिळमात्र शंका नाही. तेव्हा शक्यतो उपयुक्तता बघुनच मोबाईल हाताळणं, पाहणं योग्यतेचं वाटतंय. याकरीता स्व नियंत्रण महत्वाचं आहे. मात्र   मोबाइलच्या गरजेचं रुपांतर व्यसनात कधी होतं हे केव्हाचं कळत नाही. एकंदरीत दिवसभरातील किती तास आपणं मोबाइल हाताळतोय याचं क्यालक्युलेशन केलं तर असं लक्षात येत की, झोपेच्या व्यतीरिक्त आठ ते दहा तास  मोबाइलची जवळीकता साधलेली असते. स्वत:च्या  सदविवेक बुध्दीला हे केव्हा पटणार आहे.


मोबाइलचं गुलाम असणं हे मानसिक गुलाम असण्याचं लक्षण समजलं जातं. यातून बाहेर पडणं आवश्यक आहे. त्यामुळे शक्यतो  मोबाइलचं बंधण पाळणं आवश्यक आहे. हे स्वत:च्या आणि कुटूंबाच्यासह सर्वच दृष्टीनं हितकारक वाटतयं. स्वत:च्या मनाशी एकखुणगाठ बांधून मोबाइलचं विश्व बाजूला सारावं आणि व्यक्तीनं व्यक्तीच्या विश्वात जगावं. माणसात असतांना माणसासारखं आणि एकांतात असतांना मनासारखं वागावं...  मोबाइल गरजेचा आहे पण माणसापेक्षा अधिक मोल मोबाइला देवूच नये. क्रमश:

                                                                                       शिवाजी भोसले
                                                                                       मो. 9689964143

Comments