आयुष्याचा प्रत्येक क्षण जगायचं

आयुष्य एका श्वासाचं अंतर... यामध्ये घडणाऱ्या कित्येक घटनांची जमा बेरीज करता येणं शक्य नसतं. मात्र मागे वळून पाहिल्यास पूर्वीचा खडतर प्रवास सातत्याने आठवत राहतो. ती एक अधूरीच वाट ठरते. समोर जातांना पाठमोरी वाट केव्हाचीच साथ सोडून गेलेली असते. त्या क्षणांना परत मिळविता येणही कठीण असतं. त्या वाटेला पहावं लागतं डोळयांच्या कडेतूनचं!.. आयुष्याच्या वाटेवरती अशी अनेक वर्ष सरत जातात. मात्र त्यातील काही क्षण आयुष्यभरासाठी आपल्या मनावरती कोरली जातात. ती कायमीच...

पूर्वी घडलेल्या घटनांनी मन पुन्हा पुन्हा उफाळून येतं असतं. मनावर कोरली गेलेली आठवण मूत्यूच्या जबडयातूनच सुटते. यामध्ये आपणास काय मिळालं. याचं भ्रांततेत मन व्यथीत होतं राहतं. एखादया वेळेस काही क्षणांनी कलाटणी दिल्यास अवघं सुख आपल्या पायाशी लोळणं घालंत असतं... हेही तेवढचं सत्य आहे. मात्र हे क्वचितचं होत असावं.. प्रत्येक क्षणाला अनेक सुख दु:खांनी आयुष्य भरलेलं असतं.

आयुष्यातील स्वप्न साकार करण्यास, मेहनतीचं फळ मिळविण्यास धडपडावं लागतं. आपणास आलेले अनुभवांचे कडू क्षण पचवावे लागतात. त्यासाठी मोठा संघर्ष उभा करावा लागतो. त्यानंतर मिळालेलं यशाचं सूख शब्दात वर्णन करता येणं कठीणचं! त्यासाठी युक्ती आणि शक्तीची कसोटी लागलेली असते. अशा या अविस्मरणीय क्षणांना विसरता येत शक्य नसतं.

या कसोटीत उत्तीर्ण होणं प्रत्येकास शक्य नसतं. त्यासाठी चिकाटी.. जिदद.. कठोर मेहनत.. या गुणांचा आंर्तभाव असणं गरजेचं ठरतं. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडीअडचणीला तोंड दिल्यास, संकटांचा सामना केल्यास मेहनतीचा दगड सहजतेनं गाठता येणं शक्य होतं. यातून साकार होणाऱ्या स्वप्नांनी चेहरा सुखावून जातो. मन प्रसन्न होत जातं प्रत्येकक्षणाला...

आयुष्यात अनेक तडजोडी कराव्या लागतात. त्याचं महत्व आपणास योग्य वेळेत समजत नाही. तडजोड करण्यासाठी मोठं ध्यैर्य, सामर्थ्य लागतं. याची जाणीव असावी लागतेय. योग्य गोष्टींची तडजोड व्यक्तीला यशाचा सुखर मार्ग दाखविते. हा संघर्ष यातूनच निर्माण होतो. ही आस मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात बिंबविल्या गेली की सर्व काही सोपं होतं. यातून निर्माण होणारा स्वाभीमान अन् डोळयात अभीमान निर्माण होतो.

कधी कधी मनुष्य संकट स्वतावर ओढवून घेतो. अशा अनेक प्रसंगातून जावं लागतं. तर कधी काही क्षणांनी अशी संकट लादली जातात. यातून सुटका करणं सहज सोप नसतं. याकरीता काहींचा मार्ग हा शॉर्टकट तर काहींचा लॉंगकट असतो. दूरच्या मार्गाचा अवलंब केल्यास अडचणी निश्चित येणारचं! मात्र त्यापासून दूर न गेलेलं बर... संकट येईल त्यास निर्भिडपणे सामोर जावं. त्यास त्याच ध्यैर्याने छाती दाखवावी. जवळचा मार्ग अवलंब केल्यास ध्यैय लवकर गाठता येईल. मात्र त्यातून मिळणारा आंनद क्षणभर ठरेल. त्यास कधी सुखी समाधानी जीवन जगता येत नाही. यातून निर्माण झालेली न्युनगंडता मनास आतून जाळत राहते. अशावेळी काही झालं तरी हरायचं नाही आणि मनाच खच्चीकरण करायचं नाही. हा विचार मनास अधिक भक्कम उभारी देतो.

कधी कधी सतत दुख वाटयाला येतं तर कधी कधी सुख... जीवनात आलेलं सखं.. दुख.. पचविता यायंला हवं. सुख आल्यास पाय जमीनीवर ठेवून जगता यायला हवं तर दुख आलं तर त्यास निर्भयतेनं सामोर जाता यायला हवं. सुख आलं तर आनंदाच्या धूंदीत जगण्याचा अर्थ कळत नसतो. त्यासाठी दुख येणंही गरजेच ठरतं. दुख वाटयास आलं तर मनाच्या हिंदोळयावर बसलेले असंख्य चटके सोबतीला असतात. त्यातून काहीतरी घेता यायला हवे. नवं काहीतरी शिकता यायला हवं...!!

अनेकांच्या आयुष्यातून सुख वाळवंटातील पाण्यासारखं हरवतं. सुख त्यांच्या वाटयास येत नाही. मृगजळासारखी सुखाची वाट पाहिली जाते. सुखाने सातत्याने पाठ फिरविली असते. तिथ सर्वकाही नकोस वाटायला लागतं. मात्र एखादा क्षण जगण्याची आस निर्माण करून जातो. सुख दुखांचं येण जाणं सुरूच असतं. त्यास आपणास निभविता यायला हवं.

आयुष्यात आलेल्या प्रत्येक क्षणाला सुखदुखाची वाटणी करावी. सुखाची उफाळणारी लाट दुखाचा प्रवाह परत नेणारच! मात्र त्यास शेवटचा किनारा गाठता येणार नाही. त्यामुळे कुठल्याही क्षणाला कमी जास्त न मोजता समसमान वाटणी करावी. सुखदुखे हेच माझे सखे सोबती झालेत याचं भान आल्यास जगण्याचा अर्थ सुखर होत जातो.

व्यक्तीच्या मनास विपरीत परीस्थितीत मिळणारी सुख शांती माणसांच्या कल्याणाचा शाश्वत मार्ग आहे. आयुष्याचं जगणं शिकविल्या जातं सुखदुखाच्या दरीत... माणसांचं मन आणि कष्ट उपसण्याची तयारी नाविण्यपूर्ण स्वप्नास आकार देते. आणि याचं कुंचल्यातून ते स्वप्न प्रत्यक्षात उतरविणं सहज सोपं होतं.

आयुष्यात सुखदुख स्वतासाठी असोत किंवा इतरांसाठी... त्यांना मदतीचा हात सातत्याने द्यावा. संकटवेळी पाठीवर आधारांच्या हातांची गरज भासते. खंजीर खुपसणाऱ्या नव्हे... ही जाणीव प्रत्येकांच्या मनात उमटणे गरजेचं आहे. पाठीवर हात असल्यास जगण्याची नवी उमेद सापडते. त्यातून अनेकांच्या आयुष्यात चांगला बदल घडून येतो. ओसाड असलेल्या माळरानात नव्याने पालवी फुटते. त्यांच्यात जगण्याची नवी उर्मी, नव चेतन्य निर्माण होतं. पाठीवर पडलेला मायेचा हात जगण्याचं नव बळ देतो.


नवे प्रयत्न, नवी धडपड आयुष्या सातत्याने असावी लागते. यातून संकटावर मात करतील असा विश्वास रूंदावत जातोय. त्यांना सुखाची, नव्या स्वप्नांची धार निर्माण करता येते. दुखाच्या पल्याड सुख शोधण्यास प्रयत्नरत रहावं लागतं. पुन्हा नवी स्वप्न... नवी उमेद... नवी आशा... हे सर्व घेवून आलेल्या क्षणांना साकारावं लागतं. येणारा प्रत्येक क्षण हा कसा असेल याची कुठलीच शाश्वती देता येत नाही. त्याकरीता आयुष्यात आलेला प्रत्येक क्षण जगायंचं.....!!!

Comments