अनेक ठिकाणी विविध संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालय यांच्या माध्यमातून वकृत्व, निबंध, वाद-विवाद, नाट्य, लेखन, गायन, नृत्यू, वादन, कवी संमेलन यासह असंख्य स्पर्धांचं आयोजन केलं जातं. तसेच शासकीय स्तरांवर लोकसहभाग, युवकांचा सार्वांगिण विकास, राष्ट्रनिर्मिती व राष्ट्रनिर्माण या अनुषंगानंही स्पर्धांचं आयोजन केलं जातं. या स्पर्धेमध्ये अनेक ठिकाणची स्पर्धक सहभागी होत असतात. स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन हे संयोजक, आयोजकांचं अंतर्गत स्वरूप असतं. त्यांनी ते कसं कराव? यासाठी कुठलचं बंधन नसलं तरी त्यामध्ये समन्वय, नियोजन, सुसुत्रता, हेतू, लोकाभिमुखता, व्यापकता, बांधणी असणं आवश्यक आहे.
स्पर्धा म्हटलं की, याकरीता नियमावली, अटीचं बंधन असतंचं. वयाचं.. वेळेचं.. भाषेचं.. कौशल्याचं.. यासह असंख्य बंधणे असतात. ती स्पर्धकांसाठी सारखीच आणि परीक्षकांसाठी सारखीच असतात. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना स्पर्धेची नियमावली, अटीचं बंधन स्पर्धा सहभागीपूर्वी आणि सहभागी होत असताना सांगीतलं जातं. तसचं स्पर्धकांनाही स्पर्धेच्या नियमांचं, अटीचं माहिती असणं आवश्यक असावं. तसेच स्पर्धकांना स्पर्धां नियमांचं पालनही करण्याचं बंधनकारक केलं जातं, तशी हमीही दिली, घेतली जाते.
संबधित विषयाच्या अनुषंगानं स्पर्धक, कलावंत त्याच्या पद्धतीनं योग्य ती भूमिका, भाष्य, सादरीकरण मांडत असतो. प्रत्येक स्पर्धक, कलावंत सर्वोत्तमच मांडण्याचा प्रयत्न करतो, मात्र स्पर्धक, कलावंताला कधी स्वत:च्या चुकीचं अनुकरण लक्षात येत नाही. काही चुकांचं, सादरीकरणाचं हे स्पर्धकांच्या लक्षात येतं, ते क्षणात त्यास सारण्याचा प्रयत्नही करतात. परंतू त्या हेरण्यासाठी, एकंदरीत सादरीकरणाचं, मांडणीचं गुणांकणासाठी परीक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरते.
खरंतर स्पर्धक, कलावंतांनी मांडलेली भूमिका, भाष्य यातून त्याचं गुणांकन केलं जातं. हे गुणांकन त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात लागू होईलच, असं नाही. मात्र ठरलेली वेळ, काळ आणि एकंदरीत परिस्थिती यावरून परीक्षकांनी स्पर्धकांचं मूल्यमापन केलेलं असतं. प्रत्येक स्पर्धकाला आपणच सर्वोत्तम आहोत.. आपणचं पारीतोषीकांचे हक्कदार.. माझ्याशिवाय कुणीच नाही.. असं मनोमन वाटतं, पण परीक्षकांचा निकाल काही वेगळाच असतो. वाटणं आणि असणं यामध्ये खूप मोठा फरक आहे.
परीक्षकांनी केलेलं गुणांकन, मूल्यांकन हे स्पष्ट आणि संदिग्धपणे समोर मांडल जातं. जसं स्पर्धकांना नियमांचं, अटीचं बंधण असतं, तसचं बंधण परीक्षकांनाही असतं. याठिकाणी कितीही ओळखीचं.. नातेसंबंधाचं.. शाळा महाविद्यालय, संस्थेतील स्पर्धक, कलावंत असतील परीक्षकांनी तठस्त, समांतर, सार्वांगिण्पणे परीक्षण करणं आवश्यक आहे. आणि ते केलही जात असावं. तेव्हाचं कुठे एखाद्या स्पर्धक, कलावंताला न्याय मिळू शकतो.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कलावंत, स्पर्धकांना परीक्षकांच्या निकालावर नाराजी असते. असं अनेक ठिकणी पाहायला मिळतं. स्पर्धकांना असं वाटणं साहजिकचं आहे. आपणचं संबधित क्रमांकाचे विजेते आहोत असं स्पर्धकांना वाटतं. मात्र संबधित स्पर्धेचं परीक्षण हे सर्व परीक्षकांच्या सहमतीने होत असतं. आणि स्पर्धेचा निकाल हा परीक्षकांचा अंतिम निकाल मानावा लागतो. संबधित स्पर्धेच्या परीक्षक, समिक्षकांनी स्पर्धकांपेक्षा दोन चार पुस्तक अधिक चाळलेली असतात. त्यांचं वाचन, व्यासंग, स्पर्धांचं आकलन व अनुभव हे स्पर्धकांपेक्षा निश्चितच अधिकचं असतं. परीक्षक, समीक्षक हा क्षमता, कौशल्य, अनुभव, ज्ञान या बळावर कुठतरी परीक्षण करण्यासाठी पात्र ठरत असतो. याचाही स्पर्धकांना विसर पडतो.
स्पर्धेच्या माध्यमातून परीक्षक, समीक्षकांना धमकावणं, मारणं यासारखे प्रकार घडायला लागतात. अनेक स्पर्धक, कलावंताकडून परीक्षक, आयोजकांना अर्वाच्च व नको असलेल्या भाषेत बोललं जातं. समज गैरसमजापोटी आणि मनात आकस ठेवून अनेकांचं त्रास देण्याचा सत्र सुरू असतं. तर अनेकांना जात, धर्म, पंत, भाषेवरून भेदभाव केल्याचं वाटतं. परीक्षकांनी 'माझ्याचं बाबतीत असं केलं, नेहमीचं केलं जातं.' असं ऐकायला मिळतं. मात्र परीक्षक, समीक्षकांकडून असं होत नसावं. 'खुद को गलत भी, सही आदमी ही मान सकता है' हे स्पर्धक, कलावंतानी लक्षात घ्यावं.
स्पर्धा आणि परीक्षणाकरीता असे प्रसंग घडू लागलीत तर ते एकंदरीत स्पर्धेच्या अनुषंगाने घातकचं ठरतयं. प्रत्येक स्पर्धा निकोप, निर्भीड, निपक्ष व्हायला हवी. केवळ दोन चार स्पर्धा विजयी झालात ती स्पर्धक स्वत:ला मोठी समजू लागतायेत. त्यांचं भविष्य अंधकारमय असतं. स्वत:च्या मनात असलेला न्यूनगंड बाजूला न सारता इतरांकडे बोट दाखवित स्वत:चही काहीतरी चुकलं असावं, हे मान्य करावं लागतं. मात्र समीक्षक, परीक्षकांच्या पात्रतेची लायकी काढणं.. सोशल मीडियावर घाणेरडी कमेंट्स करणं.. त्यांच्यासोबत स्त्रीदुषण लावणं... उच्च व राजकीय पातळीवर तक्रार करून धमकावणं.. परीक्षकांची लक्तर वेशीवर टांगण.. हे कुठतरी थांबण आवश्यक आहे. हे स्पर्धक कलावंताना केव्हाच शोभनिय नसतं. खरतरं यांना स्पर्धक, कलावंत म्हणावं का? असा प्रश्न पडायला लागतो.
स्पर्धकांनी स्वत:चं अवलोकन करावं. पुन्हा नव्या जोमानं, उत्साहानं, प्रेरणेनं उभं रहावं. आणि तयारीला लागावं. स्पर्धाचं येणं जाणं सुरुचं असतं. यात स्पर्धकांनं टिकण महत्वाचं असतं. स्पर्धक, कलावंतान नको त्या मार्गावर जाऊन स्वत: शी अप्रामाणिक वागणं हे जेव्हा सर्वश्रूत होतं, तेव्हा सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक, नाट्य क्षेत्राला खालावणार ठरतं. स्पर्धाकामुळे स्पर्धेचं महत्व वाढावं, याकडे लक्ष द्यावं इतकंच...!!!

Comments
Post a Comment