प्रेम असावं जन्मोजन्मीचं !...

जगाच्या पाठिवर प्रत्येक प्राणीमात्रास हवी हवीशी वाटणारी गोष्ट म्हणजे प्रेम... या प्रेमाच्या युक्त्या कल्पुक्त्या मोठया भन्नाट असतात. प्रेम तसं प्रत्येकासाठी न उलघडणार कोडचं असतं. ते सोडविता येणही तसं शक्य नाही. प्रेमात पडण अजुन तरी कुणीचं सोडल नाही. प्रत्येक जण प्रेमात पडतोचं ! हे त्रिकालबाधीत सत्य आहे. प्रेमाची लागण न झालेली झालेली व्यक्ती दुर्मिळच! प्रेम प्रत्येकाच्या मनात खुलत... बहरत... फुलत... कोमेजत... प्रेम ही भावना खुपच निराळी आहे. प्रेमाच्या वाटेवरती पादक्रांत झालेला व्यक्ती परत वळुन बघतचं नाही. प्रेम तसं खुप वेडही असतं. कुणासाठी केव्हाही झुरत... मुरत... रमत... प्रेमाचं जग हे शास्त्रज्ञाच्या संशोधनापलीकडचं असतं. 
   
एखाद्या हदय चोरकप्पात कित्येक वर्षापासुन दडलेलं बिज कुठतरी अंकुरतचं! पाषाण हदयी पाझर फोडण्याची शक्ती प्रेम या अडीच अक्षरात दडलेली आहे. प्रेमाच कौतुक कराव तेवढ कमीच! प्रेमावर लिहायला बसलं कि रात्र सरुन सकाळची कोवळी किरणं नवसुगंध घेवुन अंगणी बागडायला लागतात कळतच नाही. जणू मखमली स्पर्शान लाजावं असं गवताच्या पात्यावर पडलेल्या दवबिंदू सारख असतं प्रेम... सकाळच्या नवपहाटेचं स्वप्न अंधारलेल्या काळजात हळुचं खुलतं. सोनेरी चादर पसरलेली असल्याने त्यावर निपचीत पडावसं वाटतं. प्रेम हे लिहता येत...  वाचता येत... बोलता येत... करता येत... पण समजता मात्र मुळीच येत नाही.

प्रेमावर लिहायचं म्हटल कि आनंदान हर्षित झालेल्या काळिज कप्पातुन शेकडो कल्पना बाहेर पडतात. मेंदूत विचारांचं काहूर माजतं. सर्वत्र तारांबळ उडते. कोठुन सुरवात करावी हेच कळत नाही. कधी कधी मनाला नकोसही वाटतं. त्या शब्दबद्ध सुंदरतेला कुठल्या माळेत गुंफाव, त्यास कुठली झालर जोडावी हे सर्व विचार कक्षेबाहेरचं! पण प्रेमावर विचार करावाचं लागतो अं हं प्रेम  विचार करुनचं कराव असही वाटतं....
         
कसं अगदी गुंतागुंत होते ना भावनांची पण प्रेमातुन पोछेहाट घेण कुणाला शक्य झालं. आणी ती घेवूही नये. एकदा जर का प्रेमात पडल तर त्यातचं टापल जावं. शेवटच्या क्षणापर्यंत प्रेम करावं. अगदी मनमुराद झुरावं. वेळ पडली तर प्रेमासाठी मरावं. प्रेमाच्या विरहाची एखादी भावना जर हदयास स्पर्शुन गेली तर काळिज कसं चर्रर्र करत. आपलचं नाही तर दुस-याचही करत. प्रेम समजता आल पाहिजे. ते समजत नाहीच पण समजुन त्यावर विचार मंथन करावं.
         
प्रेमाची बिजारोपण करावी लागत नाहीत. प्रेम हदयाच्या कडेकपारी लपलेलं असतं. काही त्यास हळुचं बाहेर काढतात. इतरांना दाखवितात. तर काहिंच प्रेम हदयातचं कुठेतरी लपविलेलं असतं. काही तर 'खुले आसमा के निचे' म्हणत जगजाहिर करतात. प्रेम लपविण हि मोठी कला आहे. ज्यांच त्यांनाच जमतं. आपण कित्येकही प्रयत्न केले तरी आपणाकडुन प्रेम लपविता येत नाही. तसं प्रेम लवविणं हि कला असली तरी त्या कलेस फारसा वाव नाही. प्रेम केव्हाही उघड करावं...  प्रेम सतत बोलक असावं... अबोल असलेल प्रेम सतत वेदना देत... प्रेम जितकं बोलक तितकचं ते मोकळेपणान बहरतं... आणी बहरलेल्या प्रेमाचा आनंद हा सर्व आनंदाहूनी श्रेष्ट असतो.
         
सर्वकाही हदयातच असतं... कुणाचं डाविकडं... कुणाचं उजवीकडं... हे नियमात बसत नसलं तरी ते चक्रव्युहासारखं असतं. तिथल्या तिथचं फिरत... स्वतालाही फिरवत... बघाना प्रेमाची कल्पना जरी विचाराधिन आली तरी चेह-यावर किती तेज उमटतं... गालावरच्या गोड स्मितानं संपूर्ण शरीर न्हाहुन निघतं... ओठांवर गुलाबी पसरते... नेत्र त्या सुखद क्षणाची आतुरतेनं वाट पाहतात... बाहूत नवचैतन्याचं बळ संचारत... केसाना मोरपंखी तत्परता लाभते... या क्षणाची ओढ लागते... जाव आणी आपल्या प्राणप्रिय प्रेयसीला कडाडुन  मिठी माराविशी वाटते... पण कधी कधी भावनाना आवर घालावाचं लागतो.
          

एकुण प्रेमात पडणं खुप सोप्प असतं. पण प्रेमात पडल्यावर त्यास निस्सिमतेनं , निरागसतेनं निभवाव लागतं. प्रेमाचं अंकुर बहरतांना त्यास खतपाणी दयाव लागत. त्यास वाढविणं हे सर्वस्वी आपल्या हाती असतं. प्रेमाला जितक दाबाव तितकं ते उफाळुन येतं.  दोन तहानलेल्या जिवांची तळमळ परीस स्पर्शान निर्माण झालेल्या नदीने तृप्त होते. प्रेमाच्या चाकोरीत कित्येक संकटाना मात करुन यशाची पताका हदय मंदिरी सतत फडकविता येते. त्यासाठी प्रेम कोडं म्हणुन स्विकारावं. ते सहजतेन सोडविता येण्यासाठी.... प्रेम असाव जन्मोजन्मीचं अंधारलेल्या वाटेवर प्रकाश दाखविण्यासाठी..........
                             
                                                   शिवाजी भोसले 
                                                   मो. 9689964143

Comments