गरीबांनी शिक्षण घ्यायचं कसं ?

दहावी, बारावीचे निकाल लागले आणी 'महाविध्यालयीन शिकणासाठी' उधाण आलं. कुठल्या संस्थेत, महाविध्यालयात प्रवेश घ्यावा, यासाठी विध्यार्थी, पालक, नातलग, सर्वांची एकच झुंबड उडाली. या नाही, त्या महाविध्यालयात प्रवेश मिळावा यासाठी एकुण ही धावपळ असते. शिकवणी वर्गाना तर अत्यंत सुगीचे दिवस आलेले असतात. या कालावधीत विविध संस्थाचे, महाविध्यालयाचे, शिकवणी वर्गाचे विविध वर्तमान पत्राचे पेजच्या पेज जाहिरातीने भरलेले असतात. ज्यानी कधी या दैनिक  वर्तमान पत्राकडे वर्षभर चुकूनही पाहिलेले नसते, अशा संस्था, महाविध्यालय, कोचिंग क्लासेस 'दर्जेदार' 'एकमेव' 'नामवंत' 'उत्कृष्ट निकालाची परंपरा असणारे' ' अनुभवी' अशा कितीतरी दिमाखदार नावान मोठया ऐटित झळकलेल असतं.
            
एकुण हा कालावधीच 'विध्येची दिवाळी' सारखा भासतो. प्रवेश मिळावा यासाठीच सर्वकाही गजबजलेलं असतं. पण जेव्हा वास्तविकता जवळुन तपासली जाते तेव्हा खुप मोठा भ्रमनिराश होतो. प्रत्येक विध्यार्थी, पालक तिथे उपलब्ध असलेल्या सुविधा, दर्जा,भव्यदिव्य वास्तु, परिसर, नामवत्ता,बघुनच प्रवेश घेतात. परंतु अशा शिक्षण संस्था, महाविध्यालय, क्लासेसचा शिक्षणाचा दर्जा, पातळी, गुणवत्ता प्रत्यक्ष प्रवेश घेतल्यावरच समजते. मोठमोठया जाहिरातबाजीला बळी पडुन, कुणाच्या सांगण्यावरुन, किंवा बाजारात निर्माण झालेल्या 'ब्रॅंड' ' ट्रेड'वरुन हे सर्व घडत असत. हे झाल श्रीमंतांचं पण गरीबांचं कस ? हा प्रश्न माझ्यासारख्या असंख्य युवकाना भेडसावत आहे.
           
आता प्रश्न हा ही पडतो कि गरीब व श्रीमंत कसं ठरवायचं ? " ज्या व्यक्तीकडे जिवन जगण्यासाठी असणा-या मुलभूत गरजा स्वमालकीच्या आहेत, कुठलही शारीरिक कष्ट उपसण्याची आवश्यकता नाही. तो श्रीमंत. व ज्या व्यक्ती या सर्व गोष्टीना उपेक्षित आहे तो झाला गरीब! " अस आपण सर्वसामान्यपणे म्हणु शकतो.
            
एखाद्या सामान्य कुटुंबातिल विध्यार्थ्याला महाविध्यालयीन प्रवेश घ्यावयाचा असला तर विध्यार्थ्याची शैक्षणीक गुणवत्ता तपासली जाते. त्यांच 'मेरीट' तपासल जातं. पण हे मेरीट नेमक येत कस ? याच संशोधन कुठच होत नाही. याच गुणवत्तेच्या आधारावर पुढील प्रवेश निश्चित होतो. साधारणत: 90%च्यावर गुण असलेल्या विध्यार्थ्याना ' प्रवेशास पात्र' म्हणुन ग्राहय धरलं जातं.  तरीही ' डोनेशन नावाचा हुंडा' ठरलेला असतो. एवढं करुनही प्रवेश नाकारला जातो. तेव्हा 65, 70 टक्केवारी गुण मिळवलेल्या सर्व सामान्य कुटुंबातिल विध्यार्थ्यनी काय कराव ? हा आजच्या समाजव्यवस्थेपुढे पडलेल यक्ष प्रश्न आहे. त्यानी शिकाव कि नाही ? त्यांच भवितव्य काय ? त्यांची दशा व दिशा कोणती ? अशा ब-याच प्रश्नांच मेंदूत वादळ उठतं. तेव्हा जगण्या, मरण्याचा प्रश्न उपस्थीत होतो.
           
आर्थीक कमकुवत पणामुळे शिक्षणापासुन बहुतांश विध्यार्थाना दूर रहावे लागते. बालवाडीपासुन डोनेशन भरावे लागत असल्यामुळे पालक पिचले जात आहेत. शेती दागिने विकुण डोनेशनचे पैसे उभे करावे लागतात.या ' डोनेशनच्या व्यवस्थेमुळे शैक्षणिक गुणवत्ता ढासळत चालली आणी काळाच्या ओघात संस्था चालक, प्राचार्य 'नावाजलेले शिक्षणसम्राट' बनलेत. हे जळजळित वास्तववादी सत्य आहे. जो प्रचंड मोठया प्रमाणावर डोनेशन देईल असाच विद्यार्थ्याना प्रवेश मिळतो. पर्यायी परीक्षेत हवे तसे गुण देवुन 'मेरीट'तयार केल जात.याच शिक्षण सम्राटांची संस्था आणी त्यांच्याच अधिकाराने चालणारी विध्यापिठाची परीक्षा. हे सर्वकाही संपुर्णपणे 'फ्रॉड' झालेलं आहे. यास एतिहासिक असा कुठलाही पुरावा नसला तरी 'सर्वकाही एकाच माळेतिल मनी' आहेत. हे समाजाने अनुभवलेलं आहे. 
           
बर या परीस्थीतीवर मात करुन एखाद्या महाविध्यालयात प्रवेश मिळालाच तर ... राहण, खाण, पिण हे ही प्रश्न उभे ठाकतात. चंगळवादी श्रीमंतांची मुले या गरीब विध्यार्थ्यांचे शोषण, रॅगिंग करतात. त्यांच्याकडुन 'नको ते कृत्य' करुन घेतात. पर्यायाने या गरीब विध्यार्थ्यास आत्महत्तेस प्रवृत्त व्हाव लागतं. केविलवाल आपल रडत शिक्षण पुर्ण कराव लागत. याविरुद्ध जर कुणी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तर तो विध्यार्थी उत्तिर्ण होउन आणी पदवी घेवुन कधीही बाहेर पडु शकणार नाही. उलट आपलेच हातपाय किंवा वेळप्रसंगी जिवसुद्धा गमवावा लागतो. हे असले प्रकार सर्रास घडतात परंतु त्याकडे कधी प्राचार्य, संस्था चालक प्रामुख्याने लक्ष देत नाहीत.
            
या डोनेशनच्या आधारावर कित्येकानी मोठ मोठे बंगले बांधले, जमिनी घेतल्या परंतु यानी कधी गरीब कुटुंबातुन आपल्या प्रचंड मेहनतीच्या बळावर समोर आलेल्या होतकरुन विध्यार्थ्यास शिक्षणास कुठलीच मदत केली नाही. (काही अपवादात्मक असतिलही) परंतु 'डोनेशनच्या गोरख धंद्यात' स्वताच प्रस्थ त्यानी निर्माण केल. आणी जाणिवपुर्वक व निदर्यपणे गरीब विध्यार्थ्यावर अन्याय केला जात आहे. तेव्हा प्रत्येकास प्रश्न पडतो. "गरीबानी शिक्षण घ्यायचं कस ?"......
            
आज शिक्षण.क्षेत्रात नुसता बाजार मांडला आहे. कुणीही येत संस्था काढत. शिकवणी वर्ग उघडत. त्यांचीही हज्जारो रुपये.फी असते. ती भरताना प्रत्येकाची नाकीनव येते. परंतु ती भरावीच लागते. महाविध्यालयात पुर्णपणे वर्ग घेतले जात नसल्याने या शिकवणी वर्गांच फार मोठ ट्रेड निर्माण.झाल. शिक्षण.घ्यायच असेल तर त्यांची प्रत्येक गोष्ट मान्य करावी लागते. हे सर्वकाही विविध संस्था महाविध्यालय शिकवणी वर्ग यांच्या संगतमताने घडत. त्यामुळे येणा-या सर्व युवा पिढयांच बौद्धीक अस्तित्वच धोक्यात येईल. आणी.हा देश परत एकदा आधुनिक पारतंत्रात, गुलामगिरीत कायमचाच ढकलला जाईल.
            

शिक्षण हा सर्वांचा घटनात्मक अधिकार असताना 'विकावु शिक्षण' निर्माण झाल्याने ब-याच लोकाना त्यापासुन दूर रहावे लागते. आज शिक्षणाची अवस्था काय झाली आहे. आजच शिक्षण हे गरीबांच राहील नसुन श्रीमंतांची मक्तेदारी बनल आहे. या विकावू शिक्षणास शासनाचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य मिळतच असत. तेव्हा सर्व सामान्यानी दाद कुणाकडं मागायची ? कि गरींबासाठी शिक्षण नाहीच म्हणुन आत्महत्तेचा मार्ग धरायचा ? याच उत्तर शासन, तथाकथीत शिक्षणसम्राट कधीतरी प्रामाणीकपणे उत्तर देतिल का ?
          
गरीबांची पोर शिकावित, उच्चाशिक्षित व्हावित म्हणुन महात्मा फुलेनी ' शिक्षण सक्तीच व मोफत असाव असा अटटहास धरला. कर्मविर भाउराव पाटलानी अनवाणी पाउलानी खेडया-पाडयात, वाडा वस्तीत, तांडयात जावुन शिक्षणाचा प्रचार प्रसार केला. राजर्षी शाहू महाराजानी शेकडो वसतीगृह बांधलित. डॉ. आंबेडकरानी जिवाच रान करुन वाघिणीच दुध पिण्यास सांगितल. भाउसाहेब देशमुखानी तर स्वताच्या पत्नीच मंगळसुत्र, वाडा गहाण ठेवला आणी गरीबाना शिक्षण मिळवुन दिल. आज त्यांचा वारसा सांगणारे व त्यांच्या नावाने शिक्षण संस्था काढणा-यानी स्वताची खळगी भरणयाचे प्रयत्न सुरु केलेत.
           
'शिवाजी शिक्षण संस्था' व रयत शिक्षण संस्था' सोडली तर संपुर्ण महाराष्ट्राभर गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार यांचे कंबरडे मोडण्याच्या प्रयत्न सुरु आहेत. कुठेच पारदर्शकता उरलेली नाही. 'सर्वकाही आपलचं' अशी स्थीती निर्माण केलेली आहे. यासाठी केंद्र, राज्यपातळीवर कठोर निर्णय घेवुन गरीब विध्यार्थ्याच्या गुणवत्तेला पायदळी तुडवुन स्वत:ची घरे भरणा-या ' तथाकथीत शिक्षणसम्राटा'पासुन देशाला वाचविण्याची गरज आहे. अन्यथा हि विस्कटलेली घडी येणा-या दोनशे तिनशे वर्षातही पुन्हा बसविता येणार नाही. त्या दिशेने पाउल टाकणे गरजेचे आहे.

                               शिवाजी भोसले
                               मो. 9689964143

Comments

Post a Comment