सध्या अकरावीच्या प्रवेशाला सर्वत्र उधाण आल आहे. मोठमोठया महाविध्यालयात प्रवेश मिळावा म्हणुन प्रत्येक पालक, विध्यार्थ्यांची मोठया प्रमाणात धडपड सुरु आहे. एकुण या सर्व वातावरणास 'ग्लोबल' स्वरुप निर्माण झाल आहे. ज्या विध्यार्थ्याना साधारणता 90%च्यावर गुण आहे. व ज्यांची मागेल तेवढं 'डोनेशन' भरण्याची तत्पर तयारी आहे. अशा विध्यार्थाना कुठल्याही नामांकित महाविध्यालयात ताबडतोब प्रवेश मिळतो. शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर महाविध्यालयीन प्रवेश सहज मिळु शकतो. परंतु प्रश्न हा उरतो कि ज्या विध्यार्थ्याकडे शैक्षणिक गुणवत्ता कमि प्रमाणात आहे. ज्यांच्याकडे आर्थिक कमतरता आहे. त्याना 'नामांकित महाविध्यालयात' प्रवेश कसा मिळेल?
खरतर आजच युग हे स्पर्धेचं युग म्हणून ओळखल जात. प्रत्येक क्षेत्रात जिवघेणी स्पर्धा लागलेली आहे. थोडीशी कमतरता भासली तर स्पर्धेतुन माघार घ्यावी लागते. आज शैक्षणिक क्षेत्राचा विचार करतो म्हटल तर या क्षेत्रात स्पर्धा करण्यास जागाच उरलेली नाही. प्रत्येक प्रस्थापितांनी या क्षेत्रात आपल्या सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेच्या बळावर स्वताच बस्तान मांडलेल आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातुन आलेला विध्यार्थी या स्पर्धेत टिकाव धरुच शकत नाही. आज कुठल्याही महाविध्यालयात प्रवेश घेतो म्हटल तर किमान 90%च्याहुन आधिक गुण घ्यावे लागतात. त्यातही 'कट ऑफ' मर्यादा पडते. कधी कधी तर 95% गुण मिळविणारा एखादा विध्यार्थी या 'कट ऑफ'च्या पेचात सापडुन त्यास प्रवेश मिळत नाही. त्यावेळी त्यास हवी असणारी शाखा, हवे असणारी फिल्ड मिळत नाही. यावेळी अशा विध्यार्थ्यानी काय कराव?
ज्या विध्यार्थाना ज्या क्षेत्रात आवड आहे. त्या क्षेत्रात त्याना प्रवेश मिळायला पाहिजे परंतु मिळत नाही. ज्यांच्याकडे गल्लेलटट पैसा आहे अशानी परस्पर 'लग्गा' लावुन आपला प्रवेश मिळवलेला असतो. या प्रवेशाची विशिष्ट मर्यादा असल्याने पुढे संस्था मागेल तेवढा पैसा भरुन प्रवेश मिळवावा लागतो. अन्यथा 'वर्ष वाया जाण्याची' भिती असते. पुर्वी कुठल्याही महाविध्यालयात 'प्रथम येईल' त्यास प्राधान्य याप्रमाणे प्रवेश मिळत होता. त्या विध्यार्थाला जेमतेम पासिंग मार्क्स जरी असतिल तरी त्यास प्रवेश मिळत होता. परंतु काळाच्या ओघात ती स्थिती आज उरलेली नाही. आज सरकारने आठवीपर्यंत परिक्षा रदद करुन काय साध्य केलय हेच कळत नाही. आठवीपर्यंतच्या परीक्षा रदद असल्याने विध्यार्थाची गुणवत्ता कशी तपासावी? आपण कुठे कमी पडतो? नेमकि आपल्यात कुठली कमतरता आहे ?याचा तपास केव्हा करावा आणी हे सर्व घडत असतांना थेट दहावीच्या परीक्षेला बसण म्हणजे ' पोहता न येता पाण्यात उडी' मारण्यासारखे आहे.
अशा या विध्यार्थाना भरभरुन पाहिजे तशी गुणवत्ता मिळत नाही. ज्याना मिळते त्यांच शारीरीक , माणशिक , आर्थिक परिस्थिती प्रबळ सक्षम असते. विविध शिकवणी वर्गानुन त्याना शिकवण मिळते. रात्रंदिस 'अभ्यास एक अभ्यास' हे त्यांच सुत्र असत. तेव्हा आई वडिलांच्या व्यवसायात मदत करणारे, शेती व्यवसायात मदत मेहनत करणारे,स्वताची आर्थिक परिस्थिती नसतांना शिक्षण घेणारे विध्यार्थी ती पात्रता कशी काय गाठु शकतिल. याच विचारमंथन होणे गरजेचं आहे.
आज सामाजिक स्थिती पाहता 60 ते 90 टक्के गुण मिळविणारे हज्जारो विध्यार्थी आहेत. त्याही पेक्षा पुढे गेल तर 'फक्त पास' म्हणुन आनंद व्यक्त करणारे लाखो विध्यार्थी आपल्याला समाजात सापडतात.त्यांच्यात गुणवत्ता नसते का? असते. पण ते शैक्षणिक गुणवत्तेत बसत नाहित. 'पुस्तकी किडयापेक्षा' त्यांच ज्ञान लाखपटीने अधिक असत. त्यांच्यातिल कलागुण पाहिले तर एखाद्या विचारवंतालाही लाजवेल एवढी त्यांची तल्लखता असते. अशा कमि गुणांच्या विध्यार्थांची प्रवेश प्रक्रिया नामांकित विध्यालयात होणे गरजेचे आहे. त्याना संधी निर्माण करुन देता आली पाहिजे. जर त्याना अशा महाविध्यालयात प्रवेश मिळाला तर त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये खुप झपाटयाने वाढ होवु शकते.
कमी टक्के गुणाच्या विध्यार्थासाठी अशी सरकारी सुट द्यायला हवी. महाविध्यालयीन कोटयातुन 10%राखिव जागा ठेवाव्यात. त्यांचा जि. आर काढुन शासकिय अनुदानित व विनाअनुदानित प्रत्येक महाविध्यालयात बंधनकारक लागू कारावा. प्रत्येक महाविध्यालयात अशा राखिव जागा जर उपलब्ध झाल्यात तर कमी टक्के गुण मिळविणा-या विध्यार्थाना समान शिक्षणाची संधी निर्माण होईल. कुठेही भेदभाव होणार नाही. जर असे झाले नाही तर या विध्यार्थ्याना नको त्या महाविध्यालयात, शाखेत प्रवेश घेवुन आपल भवितव्य स्वताच्या हाताने अंधकारमय कराव लागेल. याचा दोष कुणाला द्यायचा त्यांच्या आर्थीक परिस्थितीला, सरकारच्या ध्येयधोरणाना कि महाविध्यालयाच्या खाजगिकरणाला...
आज कमी गुण मिळविणारे विध्यार्थी एखाद्या खेडयावर शिक्षण घेताना दिसुन येतात. तिथे वाहतुकिची फारशी सुविधा नसते. शाळेचे संपुर्ण गळके छत्र, अंगणात चिखल, पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा नाही. एक एक प्राध्यापक कितितरी विषय शिकवितो. कधी कधी तर महाविध्यालयात उपस्थित नसतो. अशा भक्कास वातावरणात विध्यार्थांची गुणवत्ता कशि काय वाढणार ? आज उच्च शिक्षणाच्या नावावर फक्त 'शिक्षित क्वांटिटी' निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. पण कधी 'शिक्षित क्वालिटी' घडविण्याचा विचार सुद्धा केला जात नाही. नुसत एशीत बसुन विध्यार्थ्याच्या भवितव्याचे निर्णय घेतले जातिल. पण सत्य परिस्थिती व विध्यार्थाची शैक्षणिक गुणवत्ता वाढिसाठि ऐशिच्या बाहेर पडाव लागेल. त्यांच्या समस्या जाणुन त्यावर तोडग काढणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होतो. शैक्षणिक कमि टक्के गुण असणा-या असणा-या विध्यार्थ्याना नामांकित महाविध्यालयात प्रवेश कसा? हे चक्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यास थांबविणे गरजेचे आहे. यासाठिच हा लेख प्रपंच ...
शिवाजी भोसले
मो. 9689964143
मो. 9689964143

Comments
Post a Comment