साहित्यातिल जेष्टता व नवोदितांची गळचेपी

साहित्य हा समाजाचा आरसा असतो.यात सर्वच सकारात्मक दृष्टिने पाहिल्या गेल पाहिजे. आपण साहित्य असं प्रथमदर्शनी जेव्हा म्हणतं असलो तरी त्यात भाषेच्या सर्वच प्रकारच्या वापराचा समावेश होतो. कथा, कविता, कादंबरी, गझल, चारोळी, ललित, आत्मचरित्र, वैचारिक, प्रवासवर्णन, आठवणी इ. प्रकारांना साधारणपणे साहित्य म्हणुन संबोधलं जातं. या सर्व प्रकारामध्ये 'साहित्यत्व' हा समान गुणधर्म असल्यामुळे एकत्रितपणे त्याचा उल्लेख साहित्य म्हणुन करावा लागतो. या सर्व बाबीची निर्मिती करणारा 'साहित्यिक'या कलेचा अथांग पाईक असतो. साहित्य हि कला असते. त्यातुन नवनिर्मिती करणं. सौंदर्य निर्माण करणं. नवविचार मांडणं. नवतत्व शोधुन काढणे. यातुन मानवी जगण्याला अधिक बळकट करण्याचं महत्वपुर्ण कार्ये साहित्यिक करीत असतो.

साहित्यातुन आपण परस्परांशी संवाद साधत असतो. त्यातुन मानसांची मने जुळतात. परस्परांबद्दल आस्था निर्माण होते. आम्ही, आपण अशी एकात्माची भावना उत्पन्न होते. हि भावना आपल्याला, समाजाला घडविते. आपल्या माणुसपणाला अर्थ देते.  "साहित्य हे प्रत्येकांच्या जिवनात कुठल्या ना कुठल्या वळणावर येतचं असतं. काहिना त्याची जाण होते तर काही त्यातुन स्वानुभव घेवुन जगण्याचा मार्ग अधिक सुखकर करीत असतात."
           
साहित्यात प्रत्येकाला जगावसं वाटतयं. तसा प्रयत्नही केला जातो. साहित्याला तसं वय, वेळ, भाषा, काळ, मुळीच  नसतो. परंतु निर्मिती करणा-या साहित्यिकास हि बंधन असतात. "प्रत्येक क्षेत्रात जसं लहान मोठेपण असतं, तसं साहित्य क्षेत्रातही असतं. कुणाचं साहित्य हे उत्तम दर्जाचं असतं. तर कुणाचं अगदी तकलादू....पण साहित्य हे साहित्यचं असतं" या साहित्य.क्षेत्रात आता बरीच मंडळी जेष्ट, प्रस्थापित होवुन बसलेली आहे. स्वत:च्या नावापुढे 'जेष्ट साहितिक' असा शब्दप्रयोग करण्याची नवं प्रथाचं साहित्य क्षेत्रात निर्माण झालेली आहे.
            
बरं... हि साहित्यिक मंडळी ब-याच वेळा विविध विचारपिठावर आपलं स्वता:च वर्चस्व सिद्ध करताना दिसतात. (जुगाड लागुन संधी मिळविणं) त्यानी अनेक वर्षे साहित्य क्षेत्रात घालवली असतिलही...... त्यांच साहित्य अत्यंत दर्जेदार असेलही.... तेही एकेकाळी नवोदित होते परंतु जेव्हा त्यानी वयाची पन्नासी गाठली, ओलांडली तेव्हा ते इतरांच्या साहित्याला दुय्यम समजायला लागतात. (काही अपवादात्मक सोडलेत तर...)  त्यातही काही साहित्यिक वयाने वाढतात पण त्यांच साहित्य हे मोजक्याचं लोकांना माहिती असतं.  काही तर दोन-चार पुस्तक इकडून - तिकडून प्रकाशित करुन स्वत:ला साहित्यिक म्हणुन गौरवांकित करण्यात धन्यता मानतात. तेव्हा कळतं नाही 'जेष्ट साहित्यिक' यांना म्हणावं कि यांच्या साहित्याला?..... हा प्रश्न अनेक दिवस भेडसावत असायचा. कित्येकांचं वय वाढत पण साहित्य वाढतं नाही. अशा 'जेस्ट साहित्यिकाना काय म्हणावं?
           
अशा जेष्ट साहित्यिकांची जेष्टता जेव्हा अनेक विचारपिठावर पाहावयास मिळते. तेव्हा त्यांचं कौतुक करावसं वाटतं. त्यांच्या लेखनात तोच तोपणा सतत आढळुन येतो. एक कविता, गझल दहा - दहा वर्षे श्रोत्यांच्या माथी मारली जाते. (नाविण्य सादर करणा-या साहित्यिकास वंदन) तेच ते शब्द, तीच कविता, गझल  हे नियमित उपस्थित असणा-या श्रोत्यांना माहितीचं असतं. काय यालाच कवि, गझलकार म्हणायचं? जेष्ट साहित्यिक म्हणायचं? हिच का यांची ती नवनिर्मिती? असे अनेक प्रश्न प्रामुख्याने पडायला लागतात.
            
यापेक्षा अनेक नवोदित साहित्यिक अधिक उत्तमपणानं  दर्जेदार लिखाण करताना दिसतात. पण त्यांची फारशी दखल घेतली जात नाही. त्यांची शैली, कल्पकता, सत्यता, नवनिर्मिती प्रत्येकास भुरळ घालते.  नवं नव्या कल्पना, संकल्पना त्यांच्या विचार कक्षेतुन बाहेर पडत असतात. अस्सल प्रस्थापितांना कोडयात पाडेल अशी त्यांची नवनिर्मिती असते. परंतु या जेष्ट मंडळीला त्यांच नवोदितपण सहन होत नाही. पर्यायी अशा या नवोदितांची विनाकारण बदनामी केली जाते. नको असलेले, प्रतिमा मलिन करणारे आरोप लावुन हि प्रस्थापित मंडळी आनंदाने घडणा-या प्रसंगाचा आस्वाद घेत असतात. यास लिखित असा कुठलाही सर्वमान्य पुरावा नसला तरी ते तितकचं सत्य आहे. ते आपणास नाकारता येणार नाही.
              
अनेक नवोदित साहित्यिकांना या जेष्ट साहित्यिकानी संधी निर्माण करुन द्यायला हवी. त्यांना हक्काचं असं विचारपिठ उपल्बध करुन द्यायला हवं. परंतु तसे घडताना दिसत नाही. ' एकही नवोदित साहित्यिक मी घडविला असं ठामपणे कुठलाही साहित्यिक सांगू शकतं नाही.(नवोदितांना घडविणा-या साहित्यिकाना सलाम)  यांच्याकडे जर एखादा नवोदित साहित्यिक भेटीसाठी, चर्चेसाठी, अभिप्राय, मनोगत मागण्यासाठी पुस्तक घेवुन घेला तर त्या नवोदितांच साहित्यही पाहणं या जेष्ट मंडळीना कंटाळवाणचं वाटतयं. का वाटतयं ? त्यांचं त्यांनाचं ठावुक.....साधी प्रेमाची दोन शब्द त्यांच्या तोंडुन ऐकायला मिळत नाहीत. दाखविण्यास आणलेलं पुस्तक, ग्रंथ उघडुन पाहण्याची तसदी घेत नाहित. मानधनाची उघड मागणी केली जाते.(जे साहित्यिक अशा प्रसंगाना नवोदिताना सन्मान देतात अशांनाचं साहित्यिक मानावं.) उलट माझं 'हे पुस्तक वाचलयं का? तु त्यावर का नाही लिहलं? तो विषयही महत्वाचा आहे असे प्रतीप्रश्न विचारण्यास सुरवात होत. स्वताचं मोठेपण त्यांच्याचं मुखातुन ऐकावं लागतं. तेव्हा अशावेळी नवोदित हताश, भ्रमनिराश होवुन परत फिरतो.
            
कधी कधी अनेक जेष्ट मंडळीची हाजी - हाजी करावी लागते. त्यांना मान सन्मान द्यावा लागतो. आदराने बोलावं लागतं. जर मोठचं व्हायचं असेल तर ते सांगतिल ते ऐकावं लागतं त्यास कुठलीच बंधन नसतात. ते शब्दातही व्यक्त करता येत नाही. तेव्हा कुठं मोठ होता येतं. हा अलिखित नियम झालेलाच आहे.  अनेकांची तळवी चाटतांना या जेष्टानी वय महत्वाचं समजावं कि साहित्य...... याचा विचार करणे गरजेचं आहे.
             
कधी साहित्य संम्मेलन असलं कि यांना सन्मानानं बोलवावं लागतं. पंचतारांकित राहण्याची, खाण्याची व्यवस्था करावी लागते. मानधन द्याव. व उलट त्यांचचं पाणउतारु बोलणं ऐकावं लागतं. स्वाभिमानाचं जिवन जगणा-या साहित्यिकांना कुणाच्याही आधाराची गरज भासत नाही. कुणाच्याही मागे - पुढे करण्याची गरज वाटत नाही. पुरस्काराची तर मुळीच नाही. पुरस्कारही कसे मिळतात व मिळविले जातात हा वेगळया चर्चेचा विषय आहे.
            
 काही साहित्यिक वयाचा, पदाचा, शिक्षणाचा दबाव नवोदितांवर टाकतांना दिसतात परंतु त्यांच पुस्तकी ज्ञान नवोदितांच्या स्वअनुभवापेक्षा नक्किचं कमी असतं. एखादा नवोदित कमी शिकलेला, अडाणी, कमी प्रतिष्टित, कमी वयाचा असेल परंतु तो व्यवहारीक ज्ञानाच्या बळावर साहित्य निर्माण करत असेल, इतर ज्ञानाचा त्याचा आवाका भरपूर मोठया प्रमाणात असेल तेव्हा त्या नवोदित साहित्यिकास साहित्यावर पि.एचडी करणारे, झालेले जेष्ट मंडळी विचारत असेल, त्यांची प्रत्येक गोष्टीत सल्ला मसलत करत असेल तर मोठ कोणास समजावं? नवोदित कि जेष्ट साहित्यिक ..... याचा विचार आपण करावा.


साहित्य हि कुणाचीही मक्तेदारी नाही. प्रत्येकानी साहित्य निर्मिती करावी. मग ते मोडकया स्वरुपात का असो.... इतरांच्या साहित्यांना ही वाव द्यावा. नवोदित - जेष्ट अशी भेदभावाची कल्पना करुन साहित्यास अडचण निर्माण करु नये. जेष्टांची मनमानी, बंधण झुंगारुन लावली कि बदनामीचे डाग लागणारचं.... हुजरेगिरी व मुजरेगिरी करण्यापेक्षा आपल्या साहित्यावर भर द्यावा. ज्ञानकक्षा अधिक रुंद करुन प्रत्येक नवोदितांनी आपलं साहित्य नव्या विचारानं, नव्या उम्मेदीनं जगासमोर मांडाव. हिच अपेक्षा......

                                 शिवाजी भोसले
                                 मो. 96 89 96 41 43

Comments