अंधत्व हे मुळात निसर्ग निर्मित असतं. ते कुणासही सांगुन मिळत नसतं. तसे पुर्णत: अंधत्व व अंशत: अंधत्व असे मानवनिर्मित दोन प्रकार आपणास पहावयास मिळतात. त्यांचे अस्तित्व आहे. ते ही मानव आहेत. याकरिता 15 आक्टोंबर हा जागतिक अंध दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. या दिनास 'पांढरी काढी दिन' म्हणुनही ओळखल्या जाते.
अंधत्व लाभले म्हणुन आज समाजाकडुन खुप हेटाळणी होताना दिसुन येते. समोरच्या सामान्य व्यक्तीच्या लक्षात यावे म्हणुन अंधत्व प्राप्त झालेला व्यक्ती लाल व पांढ-या रंगाची काढी वापरतो. हि काढी अंधाच्या स्वातंत्राची निशानी म्हणुनही ओळखली जाते.
या दिनानिम्मित्त अनेक कार्यक्रम होतात. ब-याच ठिकाणी काढी वाटप होतो. मात्र अंधाना सहानुभुतीपेक्षा सहकार्य हवे असते. त्यांच्या व्यथांची जागृती होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याना मदत करण्यापेक्षा त्यानी त्यांच्या पायावर सक्षमपणे उभे रहावे याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याना शिक्षण घेण्याकरिता पहिली ते बारावी पर्यंत ब्रेन पुस्तके (ब्रेन लिपि) वापरावी लागते. हि लिपि 6 टिंबांवर आधारलेली असुन जागतिक पातळिवर सर्वाकरिता उपलब्ध आहे. मराठीतिल अ, आ, ई सारखे प्रत्येक टिंब ठरवलेले आहे. तर त्यानंतरचे शिक्षण रेकॉर्डिंगच्या माध्यमातुन पुर्ण केले जाते.
अनेक अंधत्व व्यक्ती स्पिडब्रेकर, पाय-या, मंदिरातिल घंटा यासारख्या सांकेतिक खुणांच्या आधारे दैनदिन जिवन जगतात. स्वानुभवातुन अडचणीवर मात करुन एकमेकांच्या साह्याने वाटचाल करित असताना समाज अविश्वासी स्वरुपाने त्यांच्याकडे पाहतो. त्यांचे मानसिक खच्चीकरण करतो. पैशाची सवय समाज लावतो. आम्हाला थेट मदत न करता जिवनसाधनांची मदत व्हावी अशी दुख:री भाषा ते बोलतात.
'कणुबाई वोरा' हे एकमेव अंध विध्यालय अकोला जिल्ह्यात असुन इथे सातवीपर्यंतच शिक्षणाची सोय आहे. त्यानंतरचे शिक्षण सामान्य विध्यालयात घ्यावे लागते. त्यामुळे अनेकांचे भविष्य अंधातरी आहे. विरंगुळा अंध पुनर्वसन केंद्राच्या साह्याने पुढील शिक्षण काही विध्याथी घेतात.योग्य मार्गदशन मिळाल्यास जिद्द, प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर जग कवेत घेवु शकतो हा त्याना आत्मविश्वास आहे मात्र त्याकरिता समाजाची सहानुभुती नको सर्वोतपरी सहकार्य हवे. असा सुर अनेकांच्या ओठी उमटताना दिसतो.
सर्वसामान्यांपेक्षा पोलिसांचे सहकार्य गाडीवाले घडक देतो. ट्राफिक जाम असो किंवा रस्ता ओलांडताना सामान्य माणुस जवळुन जातो. पण विचारपुस करत नाही. त्यापेक्षा पोलिसांचे अधिक सहकार्य मिळते. या मानसिकतेने प्रचंड त्रास होतो. समाजाची माणसिकता बदलावी. समाज आमच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातुन पाहतो. आम्हाला लोकांकडुन पैसा नको, सामान्य जिवन जगताना सहकार्य व्हावे. समाजाची आमच्याकडे पाहण्याची माणसिकता बदलाव.
आजच्या धकाधुकिच्या काळात कुणाकडेही वेळ नाही. मात्र अंध व्यक्ती दिसला तर त्याला सहकार्य करावे. त्यास सामान्यानी योग्य रस्ता दाखवावा. हा डोळसांकरिता सकारात्मक संदेश ठरु शकतो.
Comments
Post a Comment