दिवाळी उत्सवाचा, आनंदाचा क्षण मानला जातो. दीपावली म्हणजे परिपूर्ण होत जाण्याचा उत्सव असतो. अंधकाराला आलोकीत करुन तन - मन उजळणारा प्रकाशोत्सव म्हणजे दीपावली. ज्यांच्या जीवनात अंधार आहे त्यांच्या जीवनातील अंधार दूर करणं. उत्सव साजरे करत असतांना कुठेतरी अंतर्मुख होणं गरजेचं असतं. दीवाळी तीच असते मात्र दरवर्षी ती नव्या - वेगळया रुपात ती अवतरत असते.
दिवाळीच्या प्रकाशाने लक्ष लक्ष उजळतील कोट्यावधी घरे मात्र ज्या झोपडीत अजुनही अंधार दाटलाय त्यांना प्रकाशमान करणं गरजेचं असतं. त्यांना प्रवाहात सामावून घेणं हेच माणूसकीचं, मानवतेचं लक्षण आहे. समाजाची उन्नती व्हावी. स्वातंत्र, समता, बंधुता, आपूलकी, न्याय, धर्मनिरपेक्षता टिकवून रहावी याकरीता अहोरात्र झटणा-या समाज सुधारकांचे विचार तेवत ठेवणारी अशी एखादी दीव्याची वात आपण व्हायला हवं.
अनेक वैचित्र्य व विषमतांनी ओतपोत भरलेल्या आपल्या समाजजीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रचंड टोकाचा विरोधाभास आपणास ठायी ठायी जाणवत असतो. प्रत्येज जण आपापल्या पद्धतीने दिवाळी साजरी करत असतो. फटाके, फराळ, नवनविन वस्तु, कपडे खरेदी करुन दिवाळीचा आनंद घेत असतो. मात्र दुसरीकडे अनेक मुले मुलीना साध अन्नही मिळत नाही. फार दूर जावून काही वेगळं करण्याची गरज नाही. आपल्या सोबतीला, बाजूला असलेल्या वंचितांच्या चेह-यावर हास्य निर्माण करणं गरजेचं असतं.
"जीवन जगत असतांना कशासाठी व कुणासाठी जगायचं हे ठरविलं
तर मग कसं जगायचं हा प्रश्न उदभवत नाही."
आपण घरामध्ये मनोभावातून मातीच्या काल्पनिक लक्ष्मी मातेची पुजा करतो पण आपल्या घरातील जीवंत असणा-या लक्ष्मीला नेहमीच नकळत पणे दूर्लक्षित करतो. प्रत्येक पुरुषांइतकाच आई, बहिण, पत्नी, प्रेयसी, मैत्रीण यांना जीवनाच्या प्रत्येक क्षणाला मान सन्मान देणं गरजेचं असतं. आपण जाणतेपणानं त्यांना पाहिजे तितका मान सम्मान द्यायला विसरतो. प्रत्येक पुरुषांच्या जीवनात स्त्रीचे खुप मोठं योगदान असतं. आपण सर्वांच आयुश्य तिच्याचं स्पर्शाना अधिक उजाळ गेलं आहे. तीच तर आहे खरी मातृसत्ताक संस्कृतीची जननी...! तीच्याबद्दल कृतज्ञ व्हावचं लागतं.
अाज एकीकडे पैशानं श्रीमंत असलेली माणसं गरीबांच्या गरीबीकडे ढुंकूनही पाहत नाहीत, तर दुसरीकडे हीच गरीब माणसं नशिबाला दोष देत चिमुकल्यांच्या डोळ्यांवर हात ठेवत अापलं अपयश कुठंतरी झाकण्याचा अप्रामाणिक प्रयत्न करतायेत. दारोदार फिरणारी ही माणसं 'पिठाला अन् मिठाला महाग'... अशा स्थितीत "ती" चिमुकली जीभेच्या चोचल्यांसाठी व आई-बापाच्या संसाराला हातभार लागावा, म्हणून दारोदार भीकेसाठी हात पसरतात. मग काय दिवाळी नी दसरा एकच..! दररोजचा प्रश्न सारखाच. हिच सारी विदारकता लक्षात घेऊन त्यांची दिवाळी अानंदाची व्हावी, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अनेकानी उपेक्षितांच्या चेह-यावर हास्य निर्माण करणा-या कृती विषयी श्रीमंतांची "माणुसकी" अन् मनाची "श्रीमंती" गरीबांनी अनुभवली..!
दिशा उजळत असतानाही कुठं कुठं अंधारकडा डोकावत असतातचं. ते कोपरे उजळविण्यासाठी प्रकाशाला तिथपर्यंत पोचावं लागतं. आजही अशा अंधारकडा आजूबाजूला जाणवत आहेत. त्या दूर सारण गरजेचं आहे. भुकेल्याला आधी घास द्या आणी मगच तुम्ही अन्नग्रहण करा'. त्या तेजानं त्या वेळचा अंधकार दूर झालाच ; पण.पुढील अनेक पिढ्यांसाठी त्यातून प्रकाशाचे अनेक राजमार्ग आकाराला आलेत. जिथं अंधार आहे, संकट आहे, दैन्य आहे, तिथं सकारात्मकतेच्या उजेडाची पेरणी केली पाहिजे.
"विवेकातूनच विवेकाचा जन्म होतो व
त्याचा उपयोग जर पृथ्वीवर सतत होत राहिला,
तर पृथ्वीचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही."
प्राणपणाने जपलेल्या सोन्या नाण्यापेक्षा देशाभिमान जागृत करणारी माणसं, आपण आनंदात रहावं याकरीता झटणारं सैन्य, पोलिस अधिकारी, कर्मचारी जीवंत असणं अधिक महत्वाचं असतं. हजारोंचे फटाके उडवून पैसा उडविण्यापेक्षा तो सत्कार्याला मदत पाठवा. माणसं एकमेकांच्या सुखदुःखाशी समरस होतील याची काळजी घ्यावी.
अंधकाराचा निरास करण्यासाठी समाजमन एक झालं पाहिजे. भेदाभेदांचं अमंगल दूर झालं पाहिजे. हाच दीपोत्सवाचा संदेश असतो. अनेकांनी इतिहासाची पानं लखलखली आहेत; आणी आजही त्याच प्रकाशज्योती अनेक ठिकाणी फुलून येत आहेत. सर्वाना सोबतीस घेऊन समानतेच्या, न्यायाच्या, हक्कासाठी सकारात्मकतेची ज्योत अधिकाधिक प्रकाशमान करण्यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा.
येणा-या दीवाळीत आपल्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अन्याय, अहंकार, द्वेष, अनिष्ट रुढी-परंपरा व असहिष्णुता यांचा अंधार दूर करुन ज्ञानाची व प्रेमाची दीवाळी प्रत्येकानी साजरी करावी.
माझ्या उरात साठविलेला हा तेजाचा दीप तुझ्या अंतरी पेटणं गरजेचं आहे. हा दीप सातत्याने उजळत राहो.
" चोहीकडे अंधार झालाय,
तू एका पणतीची वात हो !बळीराजा जगाचा पोशींदा,
त्याची तू साथ हो... ! "

Comments
Post a Comment