बाळापूर'ची बाळादेवी

          बाळापूर तसं ऐतिहासिक वारसा असलेलं सधन शहर... अनेक राजे, महाराजे यांचं व-हाड प्रांतातलं राज्यकारभाराचं हक्काचं ठिकाण... कित्येकांनी येथुनच अनेक प्रांतात मक्तेदारी निभवली. येथेचं त्रिवेणी नद्यांचा संगम होतो. येथिल किल्याच्या दक्षिण दिशेला मन व महेश या नद्या उत्तर वाहिणी वाहतात. दोन्ही नद्यांच्या मध्यभागी उंच अशा टेकडीवर 'बाळादेवीचं मातेचं मंदिर' वसलेलं आहे. टेकडीच्या दक्षिण टोकावर प्राचिन महात्यांची समाधी आहे.
         बाळादेवीच्या नावावरूनचं या ऐतिहासिक शहराला 'बाळापूर' असं नाव पडलेलं असावं. हे प्राचिन ऐतिहासिक नगराच्या पुर्विपासुन एका उंच टेकडीवर वसलेलं आहे. बाळादेवी मातेचा विग्रह स्वयंभू आहे, असे विश्वस्तांचे म्हणणे असुन हे मंदिर अकराशे वर्षापुर्विचे असल्याची माहिती आहे. तसे पुरावे असल्याचे आढळुन येते. 'बाळादेवीचे मंदिर' हे परिसरातिल नागरिकांसाठी श्रद्धेचे 'एक जागृत शक्तिपिठ' म्हणुन प्रसिद्ध आहे.
          बाळादेवीचे हे मंदिर मुळात त्रिपुर सुंदरीचे पिठ आहे. आपणास 'श्री यंत्रा'ची जि महती दाखविली जाते. त्यामध्ये श्री यंत्राची देवता ही 'बाळात्रीपुरासुंदरी माताचं' आहे. श्री यंत्राची उपासना करणे म्हणजेचं 'त्रिपुरासुंदरीची उपासणा' करणे होय. या कलीयुगात सर्वश्रेष्ट अशी एक उपासणा समजली जाते ति हिच उपासना आहे.
          हिंदू धर्मातिल पवित्र अशा समजल्या जाणा-या अठरा पुराणातिल 'ब्रम्हांड पुराणात' 'ललितो पाठयायान आहे. त्यामध्ये 'बाविसाव्या अध्यायात' बाळादेवीने 'भंडासुर नामक दैत्य' व 'त्याचे तिस पुत्र' यांच्याशी पराक्रमी संघर्ष करुन त्यांचा वध केल्याची कथा व महिती वर्णनिली असल्याचे आढळुन येते. तसेच 'आगम ग्रंथात'  बाळासहस्त्र नम, श्री बाळा अष्टोतरशत नम, श्री बाळाकवच, श्री बाळामकरंद स्तव, अशा स्त्रोत्राचा उल्लेख असल्याचे कळते.
          बाळादेवीच्या मंदिरामध्ये जाण्याकरिता आपणास एकुण पंचावन्न पाय-या चढुन जाव्या लागतात. पुर्वी हे मंदिर लाकडांच्या खांबावर उभं होतं. हे मंदिर एकदम जुन्या असस्थेचे झालेले असुन त्याचा जिर्नोद्धार करणे गरजेचं होत त्यामुळे साधारणता 1978 ला ऑगस्ट महिन्यामधे या मंदिराचा जिर्नोद्धार करण्यात आला आहे. असं विश्वस्ताकडुन कळतं. आज बाळादेवीचे मंदिर हे एक हजार चौरस फुट बांधकाम असुन ते आठ खांबावर उभे असल्याचे दिसते. आतमध्ये गाभा-यात 'बाळादेवी मातेचा' सुंदर असा मुखवटा (विग्रह) बसविलेला आहे. आणी या मुखवट्यावर  (विग्रहावर) वर्षातुन दोन वेळा (21 मार्च आणी 21 सप्टेंबर रोजी) उगवत्या सुर्याची किरणे पडतात. असे म्हटल्या जाते.
        नवरात्र उत्सवामध्ये 'बाळादेवी मंदिराला' यात्रेचं स्वरुप आलेलं असतं. अनेक धार्मिक कार्यक्रम राबविले जातात. भजन, किर्तन, गोंधळांचे आयोजनही करण्यात येते. तसेच देवीची महापुजा व महाभिषेक करण्यात येतो. विजया दशमीच्या दिवशी श्रीच्या पालखीचे शिमोल्लंघन करण्यात येतं. हा उत्सव पाहण्याकरिता भाविकांची प्रचंड गर्दी आपणास पहायला मिळते.

                                @ शिवाजी एस. भोसले
                                मो. 96 89 96 41 43

Comments