बातमी आणी वाचक यांच्यातिल दुवा असलेला अन समाजातिल महत्वपुर्ण घटक म्हणजे आपली जबाबदारी पार पाडणारा पत्रकार आज आधुनिक सोयी सुविधानी अधिक प्रगत झाला आहे. पत्रकार आणी पत्रकारीता याणा सलाम करण्यासाठी देशभरात 16 नोव्हेंबरला राष्ट्रिय पत्रकार दिन साजरा होतो.
हा दिवस 'प्रेस कौंसिल ऑफ इंडिया' ने सुरु केला आहे. प्रेस कॉंसिल ऑफ इंडिया ची स्थापना 4 जुले 1966 ला करण्यात आली असुन ते एक वैधानिक.मंडळ आहे. पत्रकारांच्या विविध समस्या प्रामुख्याने समोर यायला लागल्याने त्याना सवैधानिक अधिकार मिळणे क्रमप्राप्त ठरते.
हा दिवस 'प्रेस कौंसिल ऑफ इंडिया' ने सुरु केला आहे. प्रेस कॉंसिल ऑफ इंडिया ची स्थापना 4 जुले 1966 ला करण्यात आली असुन ते एक वैधानिक.मंडळ आहे. पत्रकारांच्या विविध समस्या प्रामुख्याने समोर यायला लागल्याने त्याना सवैधानिक अधिकार मिळणे क्रमप्राप्त ठरते.
पुर्वीच्या काळामध्ये पत्रकार हा नेहरु सदरा आणी विजार, खांद्यावर शबनमची थौली त्यामध्ये दोन चार पुस्तके, पायात कोल्हापुरी चप्पल अशा साधारण वेशभुषेत असायचा. पायी फिरुन विविध क्षेत्रातिल बातम्या जमा करण्याचा त्याचा दिनक्रम ठरलेला असायचा. क्रेडल खिळा मशिनच्या साह्याने तो आपल्या बातमी तयार करुन वाचकांच्या पसंतीस उतरवायचा. कालांतराने पत्रकारीतेचे स्वरुप बदलत गेले तसे पत्रकाराच्या पेहरावासह छपाईतही सुधारणा झाली. पत्रकारीतेच्या क्षेत्रात नाविण्याने सुधारणा करण्यात आल्या. बातमी हाताने लिहुन ती झेरॉक्स पद्धतीने छपाई करण्याचाही काळ मागे पडत गेला तसा पत्रकार अधिक प्रगत व प्रगल्ब होत गेला. चिंतन, मनन, वाचन व लेखन या चतुसुत्रीचा उपयोग करुन त्यामध्ये नाविन्यता आणली गेली. कालच्या व आजच्या पत्रकारितेमध्ये प्रचंड तफावत जानवत असुन आजच्या पत्रकारीतेला विविध आधुनिक सोयी सुविधा प्रामुख्याने मिळत आहे.
पत्रकारीतेमध्ये शोध घेणे हा महत्वाचा गुण असल्याने विविध संशोधन वृती जोपासता आली. प्रत्येक क्षेत्रामध्ये असलेला सर्वोच्च शिखर नव्याने जगासमोर मांडता आले. वर्तमान पत्रमध्ये नाविन्यता दिसुन येवू लागली. त्यातुन पत्रकारिता अधिक प्रगल्भ होत गेली. तीचा दर्जा अधिक उंचावत असुन अनेकांचा आधुनिक साधनान्मुळे संपर्क असल्याने, परस्परांशी संवाद असल्याने पत्रकारीतेचा विकास साधणे सहज शक्य झाला. पत्रकाराने आत्मभान, आत्मचिंतन व आर्तर्मुख होवुन पत्रकारीता केल्याने ती वाचकांचा अधिक पसंतीस उतरत गेली. समाजातील घडलेल्या घडना आपल्या कौशल्याने मांडुन वाचकाना आकर्शित करण्याची कला वृत्तपत्राचा वाचकवर्ग वाढविते.
पुर्वीच्या काळी बातमी शोधण्यास मोठा त्राण सहन करावा लागायचा मात्र आजच्या आधुनिक काळामध्ये फेसबुक, व्हाटस अप, ट्विटर, इंटरनेट, इमेल आदीच्या साह्याने बातमी शोधत सहज सोपे झाले आहे. तसेच पत्रकाराकडे पायी चालन्याएवजी टुव्हिलर, फोरव्हिलरच्या सुविधा प्राप्त झाल्या आहेत. ककुठेही घडलेली घटना क्षणात सर्वदूर पोहचते. संघणकांच्या असन्याने लिहण्याचे काम कमी झाले. त्यामध्ये विविध कलाकृती समोर आल्याने शब्दाना सहज आकर्षित करता येते. मानवी समाजजीवन शब्दांपेक्षा चित्रांकडे अधिक आकर्षीत होत असल्याने छायाचित्रांच्या विविध कल्पना समोर आल्या. आधुनिक लेंसचे कॅमेरा आल्याने दुरवरचे चित्र सहजतेने टिपता येणे शक्य झाले. त्यातही सुधारणा होवुन चांगल्या दर्जाच्या मोबाईलने क्षणात छायाचित्र काढुन ते सहजतेने सर्वाना दाखविता येते. त्यामुळे स्पर्धा अधिक वाढिस लागली. आजच्या स्पर्धात्मक युगात पत्रकारानी वृत्तपत्रांच्या विश्वासार्हतेला कुठल्याही प्रकारे तडा जावु दिला नाही. यास मुख्य कारण म्हणजे पत्रकारांचे असलेले चोफेर वाचन होय.पत्रकारीतेत स्वताची नोंद मोबाईल, संगणकाच्या साह्याने ठेवता येत असल्याने.त्याचा.पुढील बातमीकरीता संदर्भ घेणे पुर्वीपेक्षा अधिक सोयीचे झाले आहे. .
आजच्या आधुनिक काळामध्ये अनेक सोयी सुबिधानी पत्रकारीता बहरली, फुलाली असेल मात्र पत्रकाराना आजही अनेक समस्याना सामोरे जावे.लागत आहे हे शास्वत सत्य आहे. त्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढिल लागल्या. त्यांच्यावर होणारे हल्ले, जीवघेणे प्रसंग हा चिंतनाचा विष्य असुन पत्रकारिता समृद्ध करण्यासाठी पत्रकारांच्या सरंक्षणासाठी सर्वानी एकदिलाने पुढाकार घ्यायला हवा.
Comments
Post a Comment