झेकोस्लाव्हाकिया नावाचा देश... 1940 चं साल... या काळात या देशावर नाझी राजवटीची सत्ता होती. या सत्तेविरुद्ध प्रागमधील 'चार्ल्स युनिव्हर्सिटी' च्या वैध्यकीय शाखेतील विद्यार्थ्यानी आंदोलन केलं. हे आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आलं. त्याचाच एक भाग म्हणून झेक संघराज्याच्या स्वातंत्र्यदिनी निदर्शनांचं आयोजन करण्यात आलं. तो दिवस होता 28 ऑक्टोबर 1939 चा! यावेळी निदर्शकांवर गोळीबार करण्यात आला. हा अमानवी गोळीबार प्रचंड जीवघेणा ठरला. त्यामध्ये जॉन आप्लेटाल हा विद्यार्थी गंभीर ठार झाला. त्यासोबत अनेक विध्यार्थी गंभीर जख्मीसुद्धा झाले. या विद्यार्थ्यांच्या अंत्यसंस्कारात हजारो विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला.
या घटनेनं सर्व परिसर हळहळला. त्यानंतर नाझी राजवटीच्या विरोधात जनसागर उसळला. झेकोस्लाव्हाकिया देशातील सर्व शिक्षणसंस्था बंद ठेवण्यात आल्या. अनेक विद्यार्थ्यांची धरपकड करण्यात आली. 1,200 विद्यार्थ्याना कॉन्स्ट्रेशन कॅम्प मध्ये डांबण्यात आलं. यामध्ये नऊ जणांना फासावर चढवण्यात आलं. तेही कुठली चौकशी, विचारपुस न करता... नाझी राजवटीने अमानवतेचा सर्वोच्च शिखर गाठल होतं. तो दिवस होता 17 नोव्हेंबर.... आणी हाच दिवस आंतरराष्ट्रिय विद्यार्थी दिन म्हणून ओळखला जातो.
या विद्यार्थ्यांची आठवण म्हणून 'इंटरनॅशनल स्टुडंट कौन्सिल' ने 1941 मध्ये पहिल्यांदा या दिवसाची घोषणा केली. पुढे अनेक विद्यार्थी संघटनांनी हा दिवस आंतरराष्ट्रिय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करायला सुरवात केली. पुढे 1989 च्या सुमारास झेकोस्लाव्हाकियातील सोशालिस्ट युनियन ऑफ युथ तर्फे तिथल्या साम्यवादी सरकार विरोधात भव्य निदर्शनाचं आयोजन केल. त्यांनी हिंसक स्वरुप धारण केलं. आणी व्हेल्व्हेट रिव्हॉल्युशनचा जन्म झाला.
मध्यंतरातील बरीच वर्ष हा दिवस विस्मरणात गेला. काही काळानंतर 2004 मध्ये मुंबईत वर्ल्ड सोशल फोरममध्ये जगभरातील विद्यार्थी एकत्र आलेत आणी त्यानी 17 नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्याच्या हक्काचा उदघोष केला. पुन्हा नव्याने 17 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रिय विध्यार्थी दिन म्हणून साजरा होत आहे. शिक्षणाच्या ब-याच संकल्पना बदलत गेल्यात. तसं शिक्षणाचं स्वरुप बदललं. विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हानं निर्माण झालीत. ती आव्हानं पेलत परदेशी सिमा गाठल्यात.
आज देशभरासह जगात आंतरराष्ट्रिय विद्यार्थी दिन म्हणून साजरा होत असतांना त्यामागे 17 नोव्हेंबर 1939 ची दु:खद घटना दडलेली आहे. त्या घटनेचं स्मरण विस्मरणात जाता कामा नये.

Comments
Post a Comment