उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांमुळे हरविले बालपण

       पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की, मुलांना मामाकडे जायची घाई होत असे, मात्र अलीकडे उन्हाळ्यातही निरनिराळ्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांमुळे त्यांचे बालपण हरविल्याचे चित्र अलीकडच्या काळात निदर्शनास येत आहे.उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की, मामाच्या गावाकडे जाण्याची लगभग सुरू होते. मात्र, 'झुक झुक अगीनगाडी, पळती झाडे पाहू या मामाच्या गावाला जाऊ या' ह्या काव्यपंक्ती आताच्या संगणक युगात कालबाह्य झाल्या असून, बालगोपाल संगणक, मोबाइल तसेच रिमोट कंट्रोलवरील गेम खेळण्यात व्यस्त झाले आहेत. यामुळे साहजिकच कोणीही अशा मामाच्या गावाला जाऊन धम्माल करीत नाही. मामाचे गाव आता काव्यपंक्तीत बंदिस्त झाल्याचे दिसून येते.

       मात्र, आता उन्हाळ्याच्या सुट्या लागताच वडील आपल्या मुलांकरिता विविध उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचा शोध घेताना दिसतात. यामध्ये क्रिकेट, कुस्ती, खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, बॅडमिंटन, रेकी, फुटबॉल, टेबल टेनिस, स्वीमिंग आदी क्रीडा प्रकारासह संस्कार शिबिर, व्यक्तिमत्त्व कार्यशाळा, वकृत्व, वादविवाद, संवाद, बोलीभाषा कार्यशाळा विविध मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी हजारोंची फीही भरली जाते. जीवनात ध्येय गाठतांना अशा प्रशिक्षण शिबिरांचा आवश्य लाभ होतो. तर, आपल्या हातून उद्याच्या उज्ज्वल भारताच स्वप्न साकार करणारी 'माणसं' घडविली जावीत याकरिता शहरात अशाच प्रकारच्या 'उन्हाळी शिबिरांचं' आयोजन केलं जातं. या उन्हाळी शिबिरामध्ये अगदी प्राथमिकतेपासून तंत्रशुध्दपध्दतीने प्रशिक्षण दिलं जात असल्याने मानवांचं व्यक्तिमत्त्व निश्चितपणे घडतंचं यात तिळमात्र शंका नाही.

       या उन्हाळी शिबिरांच्या माध्यमातून वडील आपल्या पाल्यांचे बालपण हिरावून घेत असल्याचे दिसून येत आहे. आपल्या पाल्यांनी शिबिरात सहभागी व्हावं याकरिता पालक मुलांवर धाक दपट करतात. मात्र, आपल्या पाल्यांनी या उन्हाळ्यांच्या शिबिरात न जाता सुटीचा मनसोक्त आनंद घ्यावा असे वाटणारे पालक विरळच दिसतात. उन्हाळ्यांच्या सुट्यांमध्ये मुले विटी दांडू, कंचे खेळणे, गार खेळणे, क्रिकेट, डाबडुबली, टायर फिरविणे, नदी, विहिरीवर पोहायला जाणे, कैऱ्या तोडणे, आदीसारख्या गोष्टीतून आनंद लुटायचे, मात्र आधुनिकतेने हा आनंद हरवित चालला आहे. मनोरंजनांची साधने ही बदलत चालली असून, ती शिबिरातून शोधण्याचा प्रयत्न होत आहे.


       संगणकावरील खेळ खेळण्याकडे बच्चे वंâपनी अधिक वळल्याने मामाच्या गावाची, उनाड बालपणाची ओढ आपसूकच कमी झाली तर दुसरीकडे खेड ती शिबिरातून शोधण्याचा प्रयत्न होत आहे. संगणकावरील खेळ खेळण्याकडे बच्चे कंपनी अधिक वळल्याने मामाच्या गावाची, उनाड बालपणाची ओढ आपसूकच कमी झाली तर दुसरीकडे खेड्यातील वातावरणाची झपाट्याने बदलल्याने खेड्याकडे जाण्याची कोणचीही मानसिकता राहिली नसल्याचे पाहावयास मिळते. हे बालपण नव्याने शोधण्यासाठी आपल्या पाल्यांना उनाडपणे उन्हाळ्यांच्या सुट्यांचा मनसोक्त आनंद घेऊ देणे हे प्रत्येक पालकांसाठी हितावह ठरेल. यातूनही जीवनाची मूल्ये शोधता आली तर उन्हाळ्याच्या सुट्या नक्कीच सार्थकी ठरतील.

                                   -- शिवाजी भोसले
                                      मो. 96 89 96 41 43

Comments