नुकताच दहावी, बारावीचा निकाल लागला आणि उत्तीर्णांच्या आनंदास उधाण आलं. निकालांची टक्केवारी बधीतली तर मन थक्क होतं. ज्यांनी घवघवीत यश संपादन केलं त्यांचं अभिनंदनचं! मात्र अपयशी ठरलेल्यांची हताश होणं हे मनास न पटणारं आहे. शालांत परीक्षे हे यश संपादन करणं कौतुकास नक्कीच पात्र आहे. मात्र या गुणांची गुणवत्ता किती हा यक्ष प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये राज्यभरातील १९३ विद्यार्थी 'शतकविर' ठरलेतं. त्यांनी शंभर टक्के गुण घेऊन इतिहास घडविला. तर तब्बल ४८ हजार ४७० विद्यार्थ्यानी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेत. ९८ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३.२२ टक्के इतकी आहे. प्राविण्य, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्यांचा विचार कल्पने पलीकडचा आहे. यामध्ये उत्तीर्ण झालेले सर्वच विद्यार्थी हे गुणवंत आहेत असं म्हणता येणार नाही. गुणांनी गुणवत्ता ठरत नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. यामध्ये जे यशस्वी झालेत ते पुढे जाऊन यशस्वी होतीलच असं नाही.
ज्या प्रमाणे उत्तीर्ण झालेल्यांचं कौतुक करतो त्याच प्रमाणे अनुत्तीर्णांचंही कौतुक व्हायला हवं. सर्वांनाच उत्तीर्ण करण्याचं धोरण शासनानं आजपर्यंत सुरू ठेवलेलं आहे. विद्यार्थ्याना वरच्या वर्गात ढकलत न्यायचं, हे कुठवर चालवायचं ? तर त्यांच्या गुणवत्तेत वाढ होतेय किंवा नाही हेही पाहणं महत्वाचं असतं.
अनेकांची डोळ्यास न झेपविणारी गुणांची टक्केवारी बघितली की आश्चर्य वाटायला लागंत. ही इतकी गुणाची टक्केवारी कशा पध्दतीनं साध्य केली असेल. कशाच्या आधारावर हे सर्व साध्य केलंयं. अखेर अभ्यास हा महत्वाचा आहेच. अभ्यासाशिवाय तरणोपाय नाही ते शाश्वत सत्य आहे. पण मराठी विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळविणं हे आजवर कुणालाही शक्य झालं नाही ते यानांच कसं काय साध्य झालं ? हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न विचार कक्षेबाहेरचा आहे. याच उत्तरही शोधण कठिण जातं.
उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुण आणि गुणवत्ता... हा प्रश्न वर्षानुवर्षे चर्चिला जात आहे. परंतु त्याचं उत्तर सहसा कुणालाही देण साध्य झालं नाही. शालांत परीक्षेमध्ये प्रचंड गुण मिळविणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांच हेच सातत्य कायम ठेवता येत का? त्यांच्या गुण आणि गुणवत्तेचं तारतम्य त्यांना साधण का कठिण जात.?
आज गुणांना, पदव्यांना कोणतीही किंमत उरलेली नाही. किंमत आहे ती कलेला... कौशल्यांना... पण कौशल्य आणि कला या केवळ अनुत्तीर्णांसाठीच आहेत हा गोड गैरसमज समाजामध्ये अधिक प्रमाणात पहावयास मिळतो. दहावीच्या परीक्षेत भरगच्च गुणांनी काय साध्य करावं ? याचा विचार विद्याथ्र्यांसह पालकांनी करणं गरजेचं आहे. आता तर शासनाने 'नापास' शेरा गुणपत्रिकेवर लिहायचं नाही तर 'फेरपरीक्षेसाठी पात्र' असं लिहायचं फर्मानचं सोडलंयं. सोबतच फेरपरीक्षा देऊनही नापास झाल्यास 'कौशल्यपुर्ण अभ्यासक्रमासाठी पात्र' असा उल्लेख करावा लागणार आहे. नुसता शब्दांचा खेळ केल्याने शिक्षणची गुणवत्ता सुधारणार आहे का? हा खरा यक्ष प्रश्न आहे.
नुकता दहावी, बारावीच्या परीक्षेत अधिक गुण मिळविलेत म्हणून गाजावाजा करायचा हे कुठवर खपवून घ्यायचं. १०० टक्के गुण मिळविणं हा चमत्काराचा प्रकार वाटतोय. तर यावर १०० टक्के विश्वास ठेवणं ही पालकांची शुध्द फसवणूक असल्यासारखं आहे. नापासांची भीती घालविण्यासाठी उचललेलं हे पाऊल म्हणजे मूळ रोगापेक्षा इलाज भयंकर असाच प्रकार आहे. मुलांच्या भविष्याचा विचार करूण पालकांनी मुलांमध्ये गुणांपेक्षा गुणवत्ता वाढिसाठी अधिक भर देण गरजेचं आहे. गुणवत्ता अधिक असेल तर त्यास कुठल्याही क्षेत्रामध्ये आपलं पाऊल सक्षमपणे रुजविता येतं. स्वताच्या सामथ्र्यांचा, अंगीभूत गुणांचा विचार करूण त्या दिशेनं पाऊल टाकली जावित. आपला पाल्य सक्षम व सशक्त कशा प्रकारे होईल यावर पालकांनी प्रामुख्याने लक्ष देणं अधिक महत्वाचं आहे
-- शिवाजी भोसले
मो. ९६८९९६४१४३

Comments
Post a Comment