नुकताच दहावी, बारावीचा निकाल लागला आणि प्रवेशाला सर्वत्र उधाण आलं. अनेकांनी यशाचं मोठं शिखर गाठलं, तर अनेकांच्या पदरी निराशा पडली. प्रचंड गुणांचं धनी व्हावं हे अनेकांना साधलं असेल तर त्यांनी हुरळून जाणं गरजेचं नाही आणि ज्यांच्या वाट्याला अगदी कमी गुण आलेत त्यांनीही हताश होण्याचं कारण नाही. यास जीवनाची प्रथम पायरीच म्हणावं लागेल. येथूनच जीवनातील चढ-उतारास आरंभ होणार आहे.
मोठ-मोठ्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून प्रत्येक पालक, विद्यार्थ्याची मोठ्या प्रमाणात धडपड सुरू होईल. एकुण या सर्व वातावरणास 'ग्लोबल' स्वरूप निर्माण होईल, यात शंका नाही. त्याकरिता आपल्यापुढील आव्हाने कोणती आहेत, त्या दिशेनं टाकलेलं पाऊल माझ्या अस्तित्वाला बळकटी देणारं ठरू शकतील काय, याचा प्राथमिकतेनं विचार करणं गरजेचं आहे.
महाविद्यालयीन जीवन अनुभवण्यास या दिशेनं टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे. या पावलावरच भविष्याची भिस्त अवलंबून आहे. अनेक विचारांच्या दिशा अनुभवयास मिळतीलच. मात्र, 'घडण्याचं आणि बिघडण्याचं' हेच वय असतं. हे लक्षात असायला हवं. यापुढे माझा मित्र, मैत्रीण ज्या महाविद्यालयात प्रवेश घेणार आहे, तिथंच माझा प्रवेश निश्चित करावा असा अट्टहास धरणं हे आधुनिक काळात उचित ठरणारं नाही. आपणास ज्या दिशेला जायचं ती दिशा या वेळेलाच ठरविणं गरजेचं आहे. स्वत:ची दिशा स्वत:लाच ठरवावी लागेल. इतरांवरती कुठवर विसंबून राहायचंय, हे मनात घट्ट करायला हवं. माझी दिशा, स्वप्न मला साकार करावयाची आहेत. इतरांच्या साहाय्याने हा प्रवास कुठवर करायचा, याचं चिंतन प्रत्येकानी करावं.
प्रत्येकाला वेगवेगळ्या दिशेला जावंच लागतं. आपणास ज्या गोष्टींची आवड आहे, छंद आहे, रस आहे त्यामध्येही करिअर करता येऊ शकतं. तशी मनास आस असणं गरजेचं आहे. त्या दिशेनं आम्हाला काही शोधता यायला हवं. कॅरीअरपेक्षा करिअरकडे अधिक लक्ष केंद्रित होण गरजेचं आहे. प्रवेश घेण्याकरिता स्वत: संघर्ष करावाच लागेल. त्याकरिता आपल्या पालकांवर विसंबून राहावं का? पालकांनीही आपल्या पाल्यांना 'दुनियादारी' दाखविण्यास पाठवायला हवं. येणारी आव्हानं त्यांना सोसायची आहेत, त्यांना हे सर्व भोगायचं आहे. त्यांनी माघार का म्हणून घ्यायला हवी. याचा विचार करणे अधिक सोईस्कर होईल.
प्रत्येकाच्या वाटा या वेगवेगळ्या दिशेला असणार आहेत, त्या दिशेनं पादाक्रांत करीत असताना आपली नाळ मायभूशी जुळलेली असणं गरजेचं आहे. अधिक सोईस्कर होईल. प्रत्येकाच्या वाटा या वेगवेगळ्या दिशेला असणार आहेत, त्या दिशेनं पादाक्रांत करीत असताना आपली नाळ मायभूशी जुळलेली असणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या उरात साठविलेलं जग आपली वाट पाहतेय. त्याला गवसणी घालण्यास पुन्हा सज्ज होऊयात.
शिवाजी भोसले
मो. 9689964143

Comments
Post a Comment