आयुष्यात प्रेम कधी, कुणावर होतं हे कुणाच्याचं हाती नसतं. अनेकांचं प्रेम हे शाळा, महाविद्यालयात जडतं. असं म्हटलं जातं. पहिले प्रेम हे अनोखचं असतं. एकमेकांवर जीव जडतो पण मनास कधीचं कळत नाही. मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी होतं हेचं कळत नाही. प्रेम झालयं असं वाटतं पण प्रिय व्यक्तीसमोर ते व्यक्त करता येत नाही. पहिलं प्रेम हे खूप छळतं. व्यक्तही होत नाही आणि अव्यक्तही राहत नाही. ओठांवर असलेल्या शब्दांना निरागस करुन टाकतं.
पहिल्या प्रेमाची अनुभूती प्रत्येकानेच घेतलेली असते. या प्रेमाची आठवण शक्य नसतं. जीवन पुढे पुढे सरत जातं पण आठवणीच स्थान कायम मनात साठतं. फार कमी लोकांना पहिलं प्रेम लाभतं. मन भारावून गेलं. फक्त तिचीच आस हवी असते. कोमेजलेल्या मनी फुटलेला हा प्रेमांकुर कुणासही दाखविता येत नाही. तीचं सोबत असणं जगण होवुन बसतं. तिच्या स्पर्शाला मन आतुरतं. तीचं हास्य पाहिलं की जगातील सर्व सुख मिळाल्यासारखी वाटतात. तीच सहवास हवा - हवासा वाटतो. तिच्या अस्तित्वाची चाहूल मन हिरावून घेते. तिच्या नजरेत, भावनेत प्रेमाची ओढ भासते.
चिव आणि अजयची ओळख महाविद्यालयाच्या प्रांगणात झाली. अनेक कार्यक्रमांची दोघांनाही आवड होती. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकमेकांशी भेटणं होवू लागलं. भेटीतून सहवास, संवाद वाढला. दोघांची मैत्री घट्ट बनली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यांचं प्रेम ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर खुललं... बहरलं... फुललं... दोघांच्याही प्रेमांकुराला सुरवात झाली होती. एकमेकांशी दिलखुलास बोलण... बाहेर भेटणं... एकमेकांची मन जाणून घेणं. उरात साठविलेलं मुक्तपणे मांडण. सर्व आनंदी चाललं होत दोघांचं.

मात्र हे फार दिवस चाललं नाही. प्राजक्ता नावाच्या मुलीनं त्यांच्या प्रेमात विघ्न आणलं. ‘त्याने मलाही प्रपोज केलं होतं, असं तीनं चिवला सांगीतलं होतं. मात्र यात कुठलही सत्य न तपासता ती फार दूर निघुन गेली. तीनं कसलाही एक विचार न करता बोलणंचं बंद केलं. तो तीच्याशी खूप बोलायचा प्रयत्न करायचा. मात्र ती त्याला सातत्याने टाळायची. कारण ती प्राजक्ताला जवळची मैत्रीण मानायची. कदाचित मनाच्या कोपऱ्यात त्याच्याविषयी तिरस्कार जडला असावा. तो आता नकोसा वाटायला लागत असावा. घडलेल्या क्षणापासून ती त्याच्याशी पुर्वीसारखी कधी बोललीच नाही. अगदी शेवटच्या टोकापर्यंत तीनं घेतलेली भूमीका दोघांमध्ये अबोला असणारी ठरली.
कालांतराने घडलेल्या घटनेचं वास्तव रुप समोर आलं. त्याने प्राजक्ताला प्रपोज केलंचं नव्हतं. मैत्रीणींच्या माध्यमातून प्रपोज न केल्याचं उघड झालं. त्याचं मन या प्रकारानं फार चिरडून निघायचं. तीचाही गैरसमज आता दूर झाला असेलं. तीचं मन त्याला शोधत होतं. त्याचंही मन तीलाचं शोधत होतं. मात्र ती अबोल सारखीच वागायची. यामध्ये अनेक महिने ओलांडली. दरम्यानच्या कालावधीत त्याचं लग्नही झालं. मात्र मनात असलेलं प्रेम कधीचं कमी झालं नव्हतं. हे लग्न त्याने तीला न सांगता केलं होतं हे जरी सत्य असलं तरी त्यावेळची वास्तवता वेगळी होती. ती शब्दात व्यक्त करता येणारीही नव्हती. त्यामुळे त्याला लग्न उरकावं लागलं होतं.
त्याचं लग्न झालयं हे तीला इतरांकडून माहिती पडलं. याचाही तीच्या मनात राग भरला असावा. तीनं तर आता अबोल राहणचं पसंत केल होतं. काही झालं तरी बोलायचं नाही हे मनोमन ठरविलेलं असावं. त्याच्या मनातल प्रेम मात्र किंचितही कमी झालेलं नव्हतं. तो अनेक वेळा तीला संपर्क साधायचा. मात्र तीचं सातत्याने टाळणं हे ठरलेलं असायचं. हे दु:ख बोचरं वाटायचं. मन व्याकुळ व्हायचं तीच्या एका शब्दासाठी... तीनं बोलावं असं मनोमन वाटायचं. कदाचित नियतीला हे मान्य नसावं. मात्र नियतीलाही हरविण्याचं धाडसं प्रेमात असतं. हे अनेकांना माहितचं नसतं.
त्याचं मन व्याकुळलेलं असायचं तीच्या प्रेमासाठी... तीचं साध बोलणंही त्याला जगावेगळं आनंद देवून जायचं. शेवटी नियतीलाही माघार घ्यावी लागली. कालांतराने दोघांच्या विचारांच मतही परावर्तित झालं. पुन्हा नव्याने मनात दाटलेल प्रेम नव्या वळणावर येवून ठेपलं. दोघांच्याही आनंदाला उधाण आलं. हे सर्व कल्पनेतून घडल्यासारखं वाटायचं. हे मनातून उमटलेलं प्रेम होतं. इथं कुठलीही विचारांची घालमेल नव्हती. आता दोघांचही प्रेम आनंदात चाललं होत. ते शेवटच्या क्षणापर्यंत चालावं.
शिवाजी भोसले
मो. 9689964143

सुंदरच... स्वानुभावावर आधारित कथा आहे का? 😎
ReplyDeleteKhupach sundar. ..
ReplyDeleteapratim Sir
ReplyDeleteanubhav ahe ki kalpana