नात्यांचा फरक पडतोय!

मानव हा समाजशिल प्राणी आहे. समाजात राहत असतांना त्या वेगवेगळ्या नात्यांनी ओळख मिळते. काही नाती ही स्नेहाची... प्रेमाची... आपुलकीची... विश्वासाची... सलोख्याची असतात. जगतांना या नात्यामध्ये सातत्याने गुरफटत जातो. कळत न कळतपणे नात्यांची वेल गुंफली जाते. अनेकाचं नातं हे विश्वासावर अवलंबून असतं. विश्वास संपला की नात संपायला वेळ लागत नाही. काळजी संपली की प्रेम संपायला वेळ लागत नाही. रक्ताच्या नात्याची ओढ वेगळीच असते, पण प्रेमाचही नात काही कमी नसतं. मात्र ते तेवढं समजून घेता यायला हवं.
   
अजयचं गेली सात वर्ष काव्यावर प्रेम होत. एकमेकांच्या जीवनचं त्यांना खूप आकस वाटायचं. त्यांचं जगणही जगावेगळचं होतं. एकमेकांच्या आनंदात त्यांना सर्वस्व वाटायंचं. दोघेही खूप आनंदाने जगायचे. त्याचं वागण, बोलण ती फार मनावर घ्यायची. तो तीच्यावर जीवापाड प्रेम करायचा. तीच्या एका एका शब्दासाठी आतुर व्हायचां. ती मात्र इतरांच्या विचार करतांना स्वतःचं जगणचं हरवून बसली होती. स्वतःची अस्मिता, अस्तित्व तीच्यापासून खुप्व दूर गेलं होत. ती अडकली होती समाजाच्या बंधणात... त्याला हवं होत तिच निरागस, निस्सीम प्रेम... तो व्याकुळ झाला होता. त्यानं तीला खूप समजाविण्याचा प्रयत्न केला. पण हे तिच्या विचारकक्षेबाहेरचं होतं.
   
दोघेही एकमेकांच्या कामात व्यस्त असायचे. तो रात्री उशीरापर्यंत ऑफिसवर असल्याने तीला सातत्याने व्हॉटसअपच्या माध्यमातून मॅसेज पाठवायचा. अधूनमधून कॉल करायचा. ऑफिसमध्ये असतांना त्याला बोलण शक्य होतं नव्हतं. जेव्हा शक्य झालं तेव्हा त्यानं संवाद सांधण्याचा खूप प्रयत्न केला.  तीलाही कामातून वेळ मिळाल्यास बोलण्याचा प्रयत्न करायची. त्यामुळे तो तीला वेळ काढुनही मॅसेज करायचा. दोघेही एकमेकांच्या मॅसेजची वाट बधायचे. रात्री दहापर्यंत त्याचं ऑफिस असल्याने तो शक्य झालं तर त्या दोघांचं बोलण कधी कधी मध्यरात्रीपर्यंतही चालायचं. रात्री दहावर काटा चढला कि ‘झोप येत आहे’ हे तीचं नेहमीचं असायचं. त्यामुळे तो कंटाळून जायचा मात्र त्याने तीला कधी शब्दानंही दुखावलं नाही. कदाचित तीच्याही हे लक्षात येत असावं. मात्र दोघांनीही शांत राहणं पसंत केलं.

ऑफिस संपल की तो तीला सातत्याने मॅसेज करायचा. तीचं मात्र नेहमी ठरलेलच  होतं ‘मला झोप येत आहे, झोपू का ? तोही त्रासल्या भावनेनं झोप म्हणायचा. तीला याचं काहीचं वाटत नाही का असा प्रश्न त्याच्या मनात घर करुन होता. तीचं असं वागण नेहमीचंचं होत. त्याला वाटायचं की तीनं प्रेमानं बोलावं, एकमेकांच्या सुखदु:खांची देवाण घेवाण करावी. प्रेमरसात न्हाहून निघावं. तीच्या कुशीत समावून जावं. तीच्या उराशी शांत डोक ठेवून प्रेमाचं मंजुळ गीत गावं. मात्र यातलं काहिच होत नव्हतं. त्याचं स्वप्न, कल्पना हवेतच विरायच्या. हे सातत्याने घडायंचं.


असंचं एक दिवस ती रात्रीच्या एक दिड  वाजेपर्यंत जागी होती. त्याला वाटलं ती आपल्याकरीताच जागी असावी. मात्र प्रत्यक्ष तसं नव्हतंचं. त्यानं झोपली नाहीस का ? असं विचारंलं तर झोप येत नाही असं उत्तर यायंचं. यावेळीही तो बोलण्याचा प्रयत्न करायचा मात्र तीचं ‘फॅमिली गृप’वर चॅटींग चालायंचं. एकदा न राहून त्यानं तिला विचारंलं. "फॅमिली गृपवर बोलायला इतकी रात्र जागी आणि माझ्याशी बोलायचं म्हटलं की झोप येते, असं का? तर तीनं कसलाही विचार न करता सांगीतल. ‘नात्यांचा फरक पडतोय’. तीचं एक वाक्य काळजाला चिरून गेलं. त्याच्या डोळ्यात अश्रूचे ओंघळ उभे राहिलेत. हदयावर झालेला हा घाव घायाळ करणारा ठरला. कापलं गेलेलं काळीज कुणालाही न कळण्यापलीकडचं होतं. तो स्तब्ध राहला. मात्र तीच्या एका 'आय लव्ह यु' या शब्दान जगातील सर्व दु:ख फिक पडलं.

शेवटी मात्र एकच सत्य हाती लागत ते म्हणजे त्याचं नात हे परकचं होत. एकमेकांचं प्रेम कितीही असलं तरी नात नातचं असतं.
                       
                                                        --  शिवाजी भोसले,
                                                         मो. 96 89 96 41 43

Comments