मैत्रीपेक्षा प्रेमचं श्रेष्ठ ...!

मैत्री दिन म्हटलं की अनेकांवर शुभेच्छांचा वर्षाव होतो. तो झालाही असेल. अनेकांच्या मोबाईल, सोशल मिडियावर मॅसेजचा ढिग पडला असेल. हदयात दडलेली भावभावना मोकळी होते. प्रत्येकांचं मन व्यक्त व्हायला लागतं. अनेकांनी आपआपल्या भावभावना प्रगट केल्या असतील. एकमेकांच्या असलेल्या नात्याचं प्रगटीकरण करण्याचं जणू वेडचं लागतं. मनातील उत्कट भावना व्यक्त करण्याचं माध्यम शोधलं जातं. नुसतं एकत्र ऐऊन मजा करणं, इतकचं मैत्रीला अभिप्रेत नसतं. मैत्री किती घट्ट आहे हे दाखविण्याचं खुळेपण अंगीकारलं जातं. त्याकरीता वेगवेगळी माध्यमं शोधली जातात. ग्रिटिंग्स, वेगवेगळी बँड असं हे स्वरुप बदलंत गेलं आहे.

बदलत्या काळानुसार मैत्रीचं, प्रेमाचं स्वरुपही बदलत गेलं. एकमेकांच्या असलेल्या नात्याचं सादरीकरण करण्यासाठी एकत्र येणं, मौज, मजा, मस्ती करणं इतपर्यंत मर्यादित स्वरुप असलेलं हे मैत्रीचं नातं खूप बदलंत गेलं. एखादी महागडी भेट वस्तू देणं, एकमेकांच्या आनंदासाठी मोठ्या स्वरुपाचं भोजन देणं. विविध बँड, फित एकमेकांना बांधण, असं मैत्री दिनाचं स्वरुप आपल्या समोर उभ केलं जातं. पूर्वी वर्ण, लिंग, धर्म, जाती भेद न पाळण हे मैत्रीला अपेक्षीत होतं. ते सध्याही आहे, पण काळाच्या प्रवाहात मैत्री प्रकट करणं, ती सिध्द करणं, त्याकरीता वाट्टेल ते करणं हे अभिप्रेत नाही.

खरतर प्रेम श्रेष्ठ की मैत्री असं कुणास विचारलं तर मनात विचारांचं काहूर माजतं. कशाला श्रेष्ठ म्हणावं. प्रेमाला की मैत्रीला... मुळात असं विचारणही अनेकांना चुकीचं वाटत. प्रेम आणि मैत्री यामध्ये तुलना करण शक्य नाही. प्रेम आणि मैत्री यामध्ये विंâचीतसं अंतर आहे. दोन्हीमध्ये पुसटशी रेष असल्यासारखं वाटतं. मैत्रीचं रुपांतर केव्हा प्रेमात होतं हेच अनेकांना कळत नाही. जीवापाड मैत्री जपणारी माणसंही प्रेमाचा निश्चितपणे स्विकार करतात. अवघ जग हे प्रेमावरच वसलेलं आहे. तरीही प्रेमापेक्षा मैत्रीलाच अधिक महत्व दिलं जातं. हे कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं. प्रेम आणि मैत्रीला सारखंचं महत्व दिलं जावं मात्र तसं होतांना फारसं दिसत नाही.

मैत्री हे नातं सर्वात प्रिय असतं. असं म्हटलं जातं. ते खरचं प्रिय असतं का? असं मनाच्या गाभाऱ्याला  एकदा विचारून बघावं. त्याचं वास्तव रुप पहावं. आलेलं उत्तर हे स्वत: पडताळून पहावं. त्यातलं गांभीर्य नक्कीच कळेल. अनेक महान विचारवंतांनी पण मैत्रीची महानता स्वीकारली आहे. त्यांनी ते वेगवेगळ्या पध्दतीनं अभिव्यक्त केलं आहे. मात्र त्यापेक्षा अधिक प्रेमाचं महानत्व त्यांनी स्विकारलं आहे. सत्य आणि प्रेम यावर मैत्री अवलंबून असते. सोबतच निपुणता, कौशल्य, धैर्य, शौर्य, संयम हे सार प्रेमात असतं. प्रत्येकाचं पाहण त्या दृष्ठिने असावं लागतं. अशी मैत्री करण्याचा प्रयास केला पाहिजे

प्रेम आणि मैत्रीचं नसलं तरी त्याला श्चासाइतकचं महत्व आहे. आपलेपणा, विश्वास, आत्मविश्वास आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संकटसमयी धावून येण्याची जिद्द हेच प्रेम आणि मैत्रीचं सर्वस्व मानलं जातं. मैत्रीही कुणासोबत असावी हे ठरवून होत नसतं तसंचं प्रेमाचंही आहे. प्रेमही कुठेही, केव्हाही आणि कुणावरही होतं. एकमेकांसोबतची विचारपूस, मैत्रीच्या भावनांना आपलेपणाचा सुगंध कधी दरवळून टाकते हे आपल्यालाही कळत नाही. तर जिवापाड प्रेम करणा-यांच्या मनातील हितगुज जाणून घेतं. त्यामुळेच कदाचित प्रेम, मैत्री या नात्याचं महत्व रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठे समजलं जातं असावं.

मैत्रीतून मिळालेला प्रेमाचा आधार हा इतर सर्वापेक्षा श्रेष्ठचं ठरतो. तिचा चुकलेला मार्ग तो सावरतो तर त्याच्या चुकांवरती चार शब्द सुनावण्यासाठी तीही मागेपुढे पाहात नाही. असचं प्रेम जीवनाच्या प्रत्येक वळणावर येतं, ते समजून घेता यायला हवं. प्रेम जीवनाच्या प्रत्येक उंबरठ्यावर प्रत्येक क्षणाला एकमेकांच्या मदतीला धावतं. तर सुखाचे क्षण व्दिगुणित करून दु:खाच्या समयाला विश्वासाचा आधार देतं. जगाच्या पाठिवर प्रेम हेच श्रेष्ठ समजलं गेलयं. आणि ते आहेही मात्र प्रेमापूर्वी मैत्रीचा अंकुर उगवित असल्याने अनेकांनी मैत्रीचेचं गोडवे गायिले असावीत. प्रेम कदाचित उपेक्षीत राहलं असावं. आणि उपेक्षीत राहणचं सातत्याने प्रेमाच्या वाट्याला आलेलं आहे. हेही शाश्वत सत्य आहे. ते कुणालाही नाकारता येणार नाही. तरीही जीवापाड प्रेम हे कुणावरतरी केलचं जातं ना....
कुणीतरी म्हटलंचं आहे. 
            कबर में दफनातेही, सारे रिश्ते टुंट जाते हैं
            चंद दिनो में अपने अपनोको भूल जाते हैं।
            कोई नही रोता उम्रभर किसीके लिए
            वक्त के साथ आँसू भी सुख जाते हैं ।।

                             --  शिवाजी एस. भोसले
                                 मो: 9689964143

Comments