शैक्षणिक सत्रामध्ये विद्यापीठ स्तरावर नव्यानेच एक निर्णय घेण्यात आला, तो म्हणजे सेमीस्टर पद्धतीचा. या पद्धतीचे अनेकांनी स्वागतही केले, तर अनेकांनी नाराजीही दर्शविली आहे. महाविद्यालयीन शिक्षण पद्धतीमध्ये विद्यापीठाने नव्यानेच सेमीस्टर पद्धती लागू केली आहे. ही पद्धती वरवर योग्य जरी वाटत असली तरी ती विद्यार्थ्यांच्या दृष्टीने घातकच ठरणारी आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण निर्माण करण्याचा शासनाचा सातत्याने प्रयत्न असतो. मात्र, त्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात आणि ते शक्यही नाही, असे अनेक शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्यावतीने (यूजीसी) सेमीस्टर पद्धती लागू करण्याचा विचार प्राधान्याने ठेवण्यात आला. आता यूजीसीचे नाव बदलून मानव संसाधन विकास मंडळ करण्यात आले आहे. या अंतर्गत येणाऱ्या अनेक विद्यापीठामध्ये सेमीस्टर पध्दती लागूही करण्यात आली होती. ती सद्यास्थितीतही आहे.
अमरावती विद्यापीठामध्ये सत्र २०१७-१८ सेमीस्टर पध्दती लागू करण्यात आली आहे. पूर्वी विज्ञान शाखेच्या पदवीत्तर वर्गांनाच लागू होती. ती आता सर्वच अभ्यासक्रमांना लागू असणार आहे. चालू सत्रात पदवीपूर्व आणि पदवीधर वर्गांचा समावेश असणार आहे. यामुळे परीक्षा दर सहा महिन्यांनी घेतली जाणार आहे.
विद्यापीठामध्ये सेमीस्टर पध्दतीने विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होणार आहेत तसेच वेळही अल्प मिळत असल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच धांगल उडणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठाने ठरवून दिलेला अभ्यासक्रमच माहिती नसतो. अशा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे तीनतेरा वाजणार आहेत. त्यांच्यासमोर सेमीस्टर पध्दती एक आव्हानच ठरणार आहे.
महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याबरोबरच अभ्यासाला सुरुवात करावी लागणार आहे. महाविद्यालय सुरळीत सुरू होण्यापर्यंत प्रथम सत्राची परीक्षा येत असल्याने त्यास अभ्यासाकडे अधिक भर द्यावा लागणार आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये वर्ग नियमितपणे होत नसल्याने विद्यार्थ्यांवर मानसिक ताणतणावाचे दडपण असणार आहे. सोबतच महाविद्यालयामध्ये दैनंदिन जाणे-येणे करावे लागणार असल्याने अनेक बाबतीत विद्यार्थी द्विधा मन:स्थितीत अडकणार आहे.
प्रथम सत्राची परीक्षा संपल्यावर दुसऱ्या सत्राच्या अभ्यासाला भिडावे लागते. यामध्ये प्रथम सत्रात काही विषय मागे राहल्यास त्याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. द्वितीय सत्रामध्ये विषय मागे राहिल्यास पुढील वर्ष आणि हे सर्व विषय याचे तारतम्य अनेक विद्यार्थ्यांना साधणे शक्य होत नाही. एकंदरीत या अभ्यासाच्या ओझ्याखालीच विद्यार्थी दडपून जातीयल. सोबतच परीक्षा दिल्यापासून ४५ दिवसात निकाल लावणे शक्य होत नाही. यासाठी बराच वेळ जात असल्याने परीक्षा, निकाल, परीक्षेचा फॉर्म भरणे यामध्येच अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अभ्यासालाही फारसा वेळ मिळत नाही.
सोबतच महाविद्यायामध्ये होत असलेल्या उपक्रमांना, कार्यक्रमांना सहभाग नोंदविणे शक्य होत नाही. विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्य यांना वेळ देणे शक्य होत नाही. यामध्ये फारसा वाव मिळणे शक्य नाही. सेमीस्टर पध्दतीमुळे प्राध्यापकांनाही कारकुनासारखी कामे करावी लागत असल्याने शिकविण्याकडे लक्ष देता येणे शक्य नाही. या पध्दतीमध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे ही पध्दती विद्याथ्र्यांच्या दृष्टीने घातकच ठरणारी आहे. यावर फेरविचार करण्याची गरज असल्याचे अनेकांचे म्हणणे येत आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण निर्माण करण्याचा शासनाचा सातत्याने प्रयत्न असतो. मात्र, त्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात आणि ते शक्यही नाही, असे अनेक शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्यावतीने (यूजीसी) सेमीस्टर पद्धती लागू करण्याचा विचार प्राधान्याने ठेवण्यात आला. आता यूजीसीचे नाव बदलून मानव संसाधन विकास मंडळ करण्यात आले आहे. या अंतर्गत येणाऱ्या अनेक विद्यापीठामध्ये सेमीस्टर पध्दती लागूही करण्यात आली होती. ती सद्यास्थितीतही आहे.
अमरावती विद्यापीठामध्ये सत्र २०१७-१८ सेमीस्टर पध्दती लागू करण्यात आली आहे. पूर्वी विज्ञान शाखेच्या पदवीत्तर वर्गांनाच लागू होती. ती आता सर्वच अभ्यासक्रमांना लागू असणार आहे. चालू सत्रात पदवीपूर्व आणि पदवीधर वर्गांचा समावेश असणार आहे. यामुळे परीक्षा दर सहा महिन्यांनी घेतली जाणार आहे.
महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याबरोबरच अभ्यासाला सुरुवात करावी लागणार आहे. महाविद्यालय सुरळीत सुरू होण्यापर्यंत प्रथम सत्राची परीक्षा येत असल्याने त्यास अभ्यासाकडे अधिक भर द्यावा लागणार आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये वर्ग नियमितपणे होत नसल्याने विद्यार्थ्यांवर मानसिक ताणतणावाचे दडपण असणार आहे. सोबतच महाविद्यालयामध्ये दैनंदिन जाणे-येणे करावे लागणार असल्याने अनेक बाबतीत विद्यार्थी द्विधा मन:स्थितीत अडकणार आहे.
प्रथम सत्राची परीक्षा संपल्यावर दुसऱ्या सत्राच्या अभ्यासाला भिडावे लागते. यामध्ये प्रथम सत्रात काही विषय मागे राहल्यास त्याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. द्वितीय सत्रामध्ये विषय मागे राहिल्यास पुढील वर्ष आणि हे सर्व विषय याचे तारतम्य अनेक विद्यार्थ्यांना साधणे शक्य होत नाही. एकंदरीत या अभ्यासाच्या ओझ्याखालीच विद्यार्थी दडपून जातीयल. सोबतच परीक्षा दिल्यापासून ४५ दिवसात निकाल लावणे शक्य होत नाही. यासाठी बराच वेळ जात असल्याने परीक्षा, निकाल, परीक्षेचा फॉर्म भरणे यामध्येच अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अभ्यासालाही फारसा वेळ मिळत नाही.
सोबतच महाविद्यायामध्ये होत असलेल्या उपक्रमांना, कार्यक्रमांना सहभाग नोंदविणे शक्य होत नाही. विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्य यांना वेळ देणे शक्य होत नाही. यामध्ये फारसा वाव मिळणे शक्य नाही. सेमीस्टर पध्दतीमुळे प्राध्यापकांनाही कारकुनासारखी कामे करावी लागत असल्याने शिकविण्याकडे लक्ष देता येणे शक्य नाही. या पध्दतीमध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे ही पध्दती विद्याथ्र्यांच्या दृष्टीने घातकच ठरणारी आहे. यावर फेरविचार करण्याची गरज असल्याचे अनेकांचे म्हणणे येत आहे.
-- शिवाजी भोसले
मो : 9689964143

Comments
Post a Comment