वयात येतांना....

वयात येतांना... असं वास्तवाचं चित्र जेव्हा डोळ्यासमोर उभं राहतं, प्रत्येकांच्या जगण्याला समाजाचं काटेरी वुंâपण उभ राहतं. खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला या नाजूक वयामधून कधीना कधी जावचं लागतं. हे वयचं असं गोंधळाचं असतं... हे वयचं असतं मनाच्या डहाळीवर स्वच्छंदी उडण्याचं... हे वयचं असतं घडण्याचं आणि बिघडण्याचं... या वयात सगळ्यांच्याचं मनात खळबळीचं वातावरण असतं. डोक्यात नुसतं विचारांचं वादळ पेटतं. हे करावं... की ते करावं... अशी गोंधळलेली परीस्थिती प्रत्येक क्षणाला निर्माण होत असते. मग तो तरुण असो वा तरुणी... प्रत्येकाला या वास्तवाच्या कसोटीवर खरं उतरावं लागतं.

खरतरं वयात येतांना प्रत्येकांचं मन असं बावचळलेलं असतं. अंगामध्ये नवशक्तीचा जोश भरलेला असतो... डोक्यामध्ये वेगळ्याचं विचारांचं भावविश्व संचारतं असतं... पावलही यशाच्या दिशेनं पादक्रांत व्हायला लागतात... चंगळवादाच्या दुनियेत मुक्तपणे वावरावसं वाटतं... हे वयचं असं असतं एखाद्या गोष्टिनं झपाटून जाण्याचं... खूल राहण्याचं... स्वच्छंदी जगण्याचं... अतीशय उत्कटपणे प्रेम करण्याचं... खुलण्याचं... बहरण्याचं... पुâलण्याचं...

याचं वयात कधी कधी पाऊलही वाकड पडतं. ते सांभाळावं लागतं. वाकडं पडणार पाऊल सकारात्मक दिशेला टाकावं लागतं. शालेय जीवन सोडून महाविद्यालयाच्या उंबरठ्यावर चढावं लागतं. तिथ जगणचं जगावेगळचं असतं. प्रत्येकांचं जगणं कसं स्टायलीश असतं. एखाद्या नट नायीकेचं अनुकरण करावसं वाटतं. ते करण्यासही पुरेसा वाव असतो. घडण्याचं आणि बिघडण्याचं वय असलं तरी जीवनाचं भान असायला हवं. कधी कधी धडपडत सावरावही लागतं.. तर कधी कधी मोक्याचे क्षण सरल्यावर पश्चाताप वाट्याला येतं. हे सर्व करत असतांना बुध्दीचं कटघर कधीचं रिकाम नसावं. नात्याला आपलेपण असावं... आपुलकी असावी. सर्व जीवनाचं सार या नात्यातचं दडलेलं असतं.

अवकाशात उडणाNया पाखरासारखं मुक्त रहावसं वाटतं. वागणं.. बोलणं.. फिरणं.. हे मुक्तचं असतं. पण कधी कधी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष समाजाचं अलिखीत नियमांचं बंधण लादलचं जातं. समाजाचे कायदे कानुन, नितिनियम नको निथे लागू पडतात आणि खरं जगणचं राहून जातं. अभीव्यक्ती स्वातंत्र असतांना समाजाच्या बंधनात कुणाला जगावसं वाटतं पण जगावचं लागतं. बरं ही बंधन तरुणांच्या बाबतीत लागू होत नाहीत मात्र तरुणी म्हटलं की न बोललेलंचं बरं... वयात तरुणही येतो आणि तरुणीही... मात्र तरुणीलाचं अधिक बंधणात रहावं लागतं. हे अनेकांच्या मनाला न पटणारं असतं.

प्रत्येक आईवडीलांना सर्वात अधिक महत्वाचं टेंशन असतं ते म्हणजे आपल्या मुलीचं... त्यांचं रागावण... दटावणं.. हे सहाजीकचं घडत असतं. हे सर्व नाजूक क्षणाचं असतं. ते समजून घ्याव लागतं. ते शब्दातही व्यक्त करता येत नाही. आणि त्यांच मन हे अव्यक्त ही होत नाही. आपल्या मुलीचं पाऊल वेडवाकडं पडणार तर नाही ना.. ती वाईट संगतीला तर लागली नाही ना... हे सर्व त्यांच्यासाठी चिंतेचं ठरतं असतं. ती सतत बाहेर फिरस्तीलाच असते. कॉलेज संपल की लगेचचं घरी का पोहचत नाही? सतत मोबईलवर बोलण असतं. कुणासोबत बोलत असेल. अभ्यासातही फारसं लक्ष देत नाही. तीचं आपलचं एक वेगळ जग असतं. परीवारातील सदस्यांशी बोलणं योग्यतेनं नसतं. यासारख्या असंख्य प्रश्नांचं काहूर त्यांच्या मनात असतं. पण ते कधीचं व्यक्त होणार नसतं. ते कधी बोलतात तर कधी मुक राहतात. त्यांचं कधी रागावणं तर कधी संयमानं जवळ घेण हे सर्व आपलेपणाचं असतं. हे वयात येतांना स्वत:ला कळणार नसतं. असंख्य विचारांचं वादळ सातत्याने घोंगावत राहत त्यांच्या मनात...

या वादळाला संयमानं शांत करता यायला हवं. खरतरं या वयात जगण्याचा अंदाज बांधता येत नाही. कुणाशी कसं वागावं... कसं बोलावं... कसं रहावं... हे सर्व न कळण्यापलीकडचं असतं. कालांतराने बदल घडून येतो. जसं जसं प्रगल्भतेचं वलय मनावर चढत तसं तसं राहणीमानही उंचावतं. तेव्हा आईवडीलांचं वागणंही योग्य वाटायला लागतं. पण त्यासाठी थोडासा वेळ जावू द्यावा लागतो. या प्रश्नांचा गुंता सोडवितांना आपल्या पाल्यासोबत दिलखुलास बोलता यावं. त्या प्रश्नाला समजून घेता यायला हवं.


वयात येतांना मनाचा आकार नव रुप साकारतं... याचं वयात मोकळेपणानं बोलण्याची, विचारांची देवाण घेवाण करण्याची संधी असते. या संधीचं सोन करता येण गरजेचं असतं. पाल्य व पालकांच्या संवादानं जगणं सुखर होतं. आनंदाचे झरे मोकळेपणानं वाहू लागतात. प्रत्येक पाल्याला आपल्या पालकांची गरज भासते या वयात... त्यांच्याशी त्यांचा मित्र म्हणून जगता यायला हवं. त्यांच्या मित्र मैत्रीणीशी थेट संवाद साधा. त्यांच्यातील असणारे समज गैरसमज दूर करा, त्यांच्याशी त्या पातळीवर जावून बोलता यायला हवं. अनेक न उलगडणाNया कोड्यांना अनुभव बळावर सोडवावं लागतं. त्यांच्या आवडी निवडीवर लक्ष द्याव लागतं. अगदी मनसोक्तपणे त्यांच्याशी वागलं की सर्वकाही शक्य होतं. हे वयचं असतं आपलं मार्गदर्शनाचं... त्यांचं बदलण्याचं....

Comments