प्रत्येक वळणावर प्रत्येकांच्या ओठी प्रेम दडलेलंचं असतं. अनेकांच्या ओठातून ते बाहेर पडतं तर अनेकांच्या ओठांमध्ये कायमचं दडतं. ओठांवर आलेल्या प्रत्येक शब्दाला पाकळ्याप्रमाणे जपता यायला हवं. गुलाबांच्या संगतीनं आपलही मन सुगंधी व्हावं. व्यक्त होणार प्रेम कधी खुलतं तर कधी कोमेजून जातं. खुलत गेलेलं प्रेम हे मनाच्या चोरकप्प्यात दडतं. जे कोमेजून गेलं ते पुन्हा नव्याने अंकुरतं. मोठ्या धाडसानं बहरतं. एकमेकांचं अंकुरण अधिंक महत्वाचं असतंं. हे त्यांनी जाणलेलं असतं. असं प्रेम हे अधिकाधिक वृध्दींगत होतं. पण ते कधी कधी बहरण्यातून उठतं. डोलदार होण्याचं स्वप्न कुठेतरी अधुर राहतं.
प्रेम हे अडीच अक्षरांचं नाव सातत्याने अधूरचं राहिलं. अनेकांच घुटमळण हे शेवटच्या क्षणापर्यंत जीवघेणं ठरतं. मन आतल्या आत सातत्याने खात जातं. प्रेमाचं अधूरपणं डोळ्यातून टपकतं. आसवांना मन मोकळ करुन देतं. मनाशीच चिंतन करायला लावतं. मनात जपलेल्या परीनं थेट काळजात केलेला घाव कायमचा मनात साठविला जातो. हे शब्दांचं जडत्व शस्त्रांपेक्षाही अधिक मोलाचं मानलं जातं. एकमेकांच्या प्रतिवादानं प्रेम केव्हा नाहिसं होत हेचं कळत नाही. दोघांच्याही मनात प्रेमाचं स्थान असतं पण कुठेतरी त्याला नव्याने व्यक्त करता येत नसतं. त्यामुळे मनाच्या डहाळीतील पानगळ होण गरजेचं असतं. ते पुन्हा नव्याने अंकुरण्यासाठी...
प्रेम हे प्रत्येकांच्या जीवनात असतंचं. ते कुणालाही टाळता आल नाही. प्रेमाचं अंकुरण आणि कोमेजणं हे एकमेकांवर अवलंबून असतं. अनेकांचं प्रेम बहरतं पण ते शेवटावर जात नाही. तर अनेकांना अपेक्षा नसतांनाही ते शेवटावर नेलं जातं. याकरीता एकमेकांच्या मनाला जपणं अधिक गरजेचं असतं. मात्र ते प्रत्येकाकडून होतचं अस नाही. प्रियकर प्रेयसींमध्ये सामंजस्य, समजूतदापणाची भावना फार कमी उरलेली असते. प्रियकराला वाटतं तीनं मला समजून द्याव. प्रेयसीला वाटतं त्यानं मला समजून द्याव. पण एकमेकांना समजून घेण्याचं धाडसं दोघांनीही दाखवायचं असतं. हेचं अनेकांना कमी कळतं.
पुर्वी होतं तसं नातं आता उरलेलं नसतं. त्यामध्ये काही कारणास्तव विघ्न आलेलं असतं. हे टाळता येतं मात्र त्याकरीता दोघांपैकी एकाला सुरवात करणं गरजेचं असतं. एकमेकांचं मन बदलविता येतं हे शाश्वत सत्य आहे. ते बदलविण्यासाठी पुढाकाराची आवश्यकता असते. ती प्रत्येक प्रियकर प्रेयसीत यायला हवी. तेव्हा प्रेमाचं जगणं हे अधिक सुंदर होतं. एकमेकांचं जगणं... वागणं... बोलणं... यानं नयनात अश्रूचं जतनं होत असेल तर ते त्याचं कमजोरपण न समजावं. ते त्याच्या मनाचं मोठेपण असतं.
प्रेयसी प्रियकरांचं नातं हे नाजूक असतं. चंगळवादाचं जगणं स्वीकारलेलं अस्तित्व कुणालाही नाकारता येणार नसतं. त्याकरीता एकमेकांचं मन जपणं हे सर्वात मोठ माध्यम ठरतं. एकमेकांचं मन दुखवलंचं तर परस्परांतील आकर्षणाला आहोटीचं स्वरुप येतं. बोलणं, भेटणं कशातच त्यांना रस वाटत नाही. म्हणून प्रेमाचं हे नातं टिकवायचं असेल तर एकमेकांनी मिळून काय करता येत यावर चिंतन करावं. वादांचं नेमक कारण कुठलं असावं हेही शोधणं गरजेचं असतं. एकमेकांना का दूर जावं वाटतं. यापेक्षा एकमेकांचं जवळीकतेचं महत्व पटवून देता यायला हवं. परस्परांचं प्रेम व्यक्त होत तेव्हा भावनांचं जपणं अधिक सहानुभूतीनं साध्य करावं.
संवादाचं माध्यम हे परस्परांना वेगळ्या वळणावर नेवून ठेवतं. प्रियकर प्रेयसीचं नात असलं तरीही मित्रत्वाच्या भावनेनं संवाद साधावा. एकमेकांच्या कुशीर शिरावं यामुळे मनातील भेद दूर सारता येतील. आपुलकीचा ओलावा अधिक निर्माण कराता येईल. त्यामुळे प्रेम अधिक दृढ होतं. एकमेकांच्या कुशीत बिनधास्तपणे मन मोकळ करता येतं. यामाध्यमातून आत्मीक सुरक्षीतेला जपलं जातं. आणि प्रेमाची भावना जागृत करता येते. हे वाटतं तेवढं सोप नसतं. पण सहज साध्य करता आलं तर आपलं प्रेम कायमचं मनात जागविता येतं. सामंजस्याचं प्राबल्य हे आंतरमनाच्या गाभाNयातून निघालेलं असतं. आपलं असलेलं गमविण्याचं दु:ख हे त्यांनाचं कळतं, ज्यांनी आपलं सर्वस्व तीच्यासाठी अर्पण केलेलं असतं. एका शायराने हे शब्दातून व्यक्त केलचं आहे.
तेरी आखों की दरीया का उतरना भी जरुरी था !
मोहब्बत भी जरुरी थी, बिच्छडना भी जरुरी था !!
शिवाजी भोसले, अकोला
मो. ९६८९९६४१४३

Comments
Post a Comment